मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 32 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे कोकेन आणि हेरॉईन जप्त केले आहे. एका अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली.
सीमा शुल्क अधिकाऱ्याने सांगितले की 31.29 कोटी रुपये किमतीचे 4.47 किलो हेरॉईन आणि 15.96 कोटी रुपये किमतीचे 1.596 किलो कोकेन कागदपत्रांच्या फोल्डरच्या कव्हरमध्ये कपड्याच्या बटणांमध्ये लपवले होते.
आम्ही अमली पदार्थांच्या तस्करीच्या विरोधात मोहीम सुरू केली आणि या रॅकेटचा पर्दाफाश केला, असे अधिकारी म्हणाले. आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.