चार वर्षाच्या मुलाने सर केला कठीण असा भैरवगड! SaamTvNews
मुंबई/पुणे

चार वर्षाच्या मुलाने सर केला कठीण असा भैरवगड!

कल्याण मधील ओम महादेव ढाकणे (०४ वर्ष) या चिमुकल्याने सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील सर्वात कठीण असा समजला जाणारा किल्ले भैरवगड सर केला आहे.

प्रदीप भणगे

कल्याण : कल्याण मधील ओम महादेव ढाकणे (०४ वर्ष) या चिमुकल्याने सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील सर्वात कठीण असा समजला जाणारा किल्ले "मोरोशीचा भैरवगड" (Bhiaravgad) सर करून पुन्हा एकदा कल्याण (Kalyan) शहराच्या मुकुटात कौतुकाचा तुरा खोवला आहे. याआधीही महाराष्ट्रातील सर्वात लहान गिर्यारोहक म्हणून त्याने कल्याणच्या श्री. मलंगगड सर करून यशाला गवसणी घातली होती.

हे देखील पहा :

दरम्यान, मोरोशीचा भैरवगड  हा किल्ला सर करणारा सर्वात लहान गिर्यारोहक असून त्याने कल्याण शहराचे नाव अधिक उंचावर नेले आहे. कल्याण मधील "सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर" हा संघ सह्याद्रीच्या (Sahyadri) खोऱ्यात धाडसी मोहिमा नित्यनेमाने आखत असतो.

"सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर" ने  रात्री ०१ वाजता मोरोशी या गावातून ट्रेकला सुरुवात केली आणि  जंगलातील वाट तुडवत मोरोशीच्या भैरवगडाच्या माचीवर सुमारे पहाटे ३ ला पोहचल्यानंतर तिथे थोडा आराम करून पुन्हा एकदा कड्याच्या पायथ्याशी पोहचण्यासाठी सुमारे १ तासाचा ट्रेक केला आणि नंतर सकाळी पुन्हा पवन घुगे, दर्शन देशमुख, रणजित भोसले, भूषण पवार, अक्षय जमदरे, राजेश गायकर, प्रशिल अंबाडे, लतीकेश कदम आणि विकी बोरकुले यांच्या मदतीने गड चढत ओमने गड सर केला.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

SCROLL FOR NEXT