पनवेलमध्ये गॅस चोरीचा धंदा करणारी चौकडी अटकेत; ३९ लाखांचा मुद्देमाल जप्त विकास मिरगणे
मुंबई/पुणे

पनवेलमध्ये गॅस चोरीचा धंदा करणारी चौकडी अटकेत; ३९ लाखांचा मुद्देमाल जप्त

पनवेलमध्ये गॅस चोरीचा धंदा करणाऱ्या चौकडीला पनवेल तालुका पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ३९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विकास मिरगणे

पनवेल: पनवेलमध्ये गॅस चोरीचा धंदा करणाऱ्या चौकडीला पनवेल तालुका पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ३९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पनवेल तालुक्यातील पोयंजे गावाच्या हद्दीत आपापसात संगनमत करून चार जण एलपीजी गॅसच्या टँकर मधून गॅस चोरी करत होते. (Four arrested for gas theft in Panvel; 39 lakh confiscated)

हे देखील पहा -

त्यासाठी आवश्यक असणाऱ्या मशिनरी त्याठिकाणी आणून बेकायदेशीरपणे वेगवेगळ्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये विक्री करण्यासाठी काढत असताना पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत शिर्के व पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला. पनवेल तालुका पोलिसांनी केलेल्या या कारवाईत एक टँकर, एक महिंद्रा बोलेरो जीप, एक मोटारसायकल, सिलिंडर्स, जुगाड मशीन यासह इतर ऐवज असा मिळून जवळपास ३९ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या प्रकरणी सोमराज बिष्णोई, मांगीलाल बिष्णोई, सुभाष पुनिया व जलालूद्दीन अलीमुद्दीन खान या चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे व आरोपींच्या अटकेमुळे पनवेल परिसरात बेकायदेशीररित्या चालणाऱ्या अवैध व्यावसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम

Neha Kakkar: 'कँडी शॉप' गाण्यातील अश्लील डान्समुळे नेहा कक्कर ट्रोल; नेटिझन्स म्हणाले, 'देशाच्या संस्कृतीला कलंकित...'

Malad Tourism: गुलाबी थंडी अगदी जवळच फिरायला जायचंय? मग मालाडमधील या जागा ठरतील बेस्ट ऑप्शन

Secret Santa Gifts : लाडक्या मित्रांसाठी 'सिक्रेट सांता' गिफ्ट्स, 500 रुपयांच्या आता युनिक भेटवस्तू

Pune News: पुण्यातील आदिवासी पाड्यात पहिल्यांदाच प्रकाश, ४० वर्षानंतर वीज पोहचली

SCROLL FOR NEXT