गजा मारणेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर कारच्या ताफ्यातून मिरवणूक काढल्याप्रकरणी गुन्ह्यात कुख्यात गुंड गजानन मारणे याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
गजा मारणेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
गजा मारणेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळलाSaam Tv News
Published On

प्राची कुलकर्णी, पुणे

पुणे: तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर कारच्या ताफ्यातून मिरवणूक काढल्याप्रकरणी गुन्ह्यात कुख्यात गुंड गजानन मारणे याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. सत्र न्यायाधीश ए. एन. मरे यांनी हा निकाल दिला. (Gajanan marne's bail application was rejected by the court)

हे देखील पहा -

मिरवणूक प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात देखील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात देखील मारणे याचा जामीन फेटाळण्यात आला आहे. पुणे-बंगळूर बाह्यवळण महामार्गावर चांदणी चौकात १५ फेब्रुवारी रोजी रात्री हा प्रकार घडला. मारणे आणि त्याच्या साथीदारांनी मिरवणुकीची ध्वनीचित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित करून दहशत निर्माण केली होती. मारणे टोळीच्या उच्छादाची दखल घेऊन पोलिसांनी मारणे आणि साथीदारांविरोधात कोथरूड, वारजे तसेच ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

मारणे याने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांत जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. त्यास अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी विरोध केला. तसेच गजानन मारणे हा टोळी चालवितो तो आणि त्याच्या साथीदारांविरोधात विविध पोलिस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोडा, अपहरण, दंगा करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, गंभीर दुखापत करणे, बेकायदेशीर मालमत्ता बळकाविणे, जाळपोळ आदी गुन्हे दाखल आहेत. तसेच मोक्का कायद्यान्वयेही गुन्हे दाखल आहेत.

गजा मारणेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
दिल्लीत 1 जानेवारी 2022 पर्यंत सर्व प्रकारच्या फटाक्यांवर बंदी

दरम्यान, आरोपीने काढलेल्या रॅलीची चित्रफीत समाजमाध्यमावर पसरली आहे. आरोपींनी दहशत निर्माण करीत सरकारी कर्मचाऱ्यास ढकलून दिले आहे. तसेच कारचे सनरूफ उघडे ठेवून स्वत:ला बाहेर प्रदर्शित करून दहशत माजवीत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. आरोपीने कोणत्या हेतुने रॅली काढली? तसेच सुमारे 500 वाहनांसह शक्तीप्रदर्शन केले आहे. रॅलीचे आयोजन कोणी केले आणि यासाठी कोणी आर्थिक पुरवठा केला याचा शोध घ्यायचा असल्याचा युक्तिवाद ॲड. कावेडिया यांनी केला.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com