Pratibha Patil Voting Pratibha Patil Voting
मुंबई/पुणे

Pune Election : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

Pratibha Patil Voting : कोथरूड विधानसभा मतदारसंघात भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी मतदानाचा हक्क बजावला.

Namdeo Kumbhar

Maharashtra Vidhan Sabha Election : भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क बजावला आहे. पुण्यातील निवासस्थानी माजी राष्ट्रपतींनी मतदान केले. प्रतिभाताई पाटील यांचं वय 89 असून, निवडणूक आयोगाच्या होम व्होटिंग उपक्रमानुसार घरीच मतदानाचा हक्क बजावला.

कोथरूड विधानसभा मतदारसंघात भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी मतदानाचा हक्क बजावला. भारत निवडणूक आयोगाच्यावतीने गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले.

कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये १५ व १६ नोव्हेंबर रोजी नमुना १२ ड भरुन दिलेल्या ८५ वर्षापेक्षा अधिक वय असलेले जेष्ठ नागरिक तसेच दिव्यांग मतदारांचे गृहभेटीद्वारे मतदान नोंदवून घेण्यात येत आहे. त्यापैकी आज ८५ वर्षापेक्षा अधिक वय असलेले ९१ जेष्ठ नागरिक तसेच ४ दिव्यांग मतदार असे एकूण ९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

या प्रक्रियेकरिता विधानसभा मतदारसंघात एकूण आठ पथकांची स्थापना करण्यात आली आहे, पथकाच्यावतीने भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत मतदारांच्या घरी जाऊन मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाढे यांनी दिली आहे.

निवडणूक कर्तव्यावर असलेल्या ८ हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांनी पुण्यात बजावला मतदानाचा हक्क

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरीता कर्तव्यावर असलेल्या एकूण ८ हजार २७२ अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रशासनाच्यावतीने उपलब्ध करुन दिलेल्या सुविधा केंद्रावर १४ नोव्हेंबर अखेर टपाली मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे. पुणे जिल्ह्यात नमुना १२ भरुन दिलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्याच्या टपाली मतदानाकरीता १४ नोव्हेंबर अखेर सुमारे १६ हजार मतपत्रिका प्राप्त झालेल्या आहेत, त्यापैकी जुन्नर विधानसभा मतदारसंघात-१३२, आंबेगाव-१४१, खेड-आळंदी-२३१, शिरूर-४००, दौंड-१ हजार २५१, इंदापूर-६०३, बारामती-५२१, पुरंदर-३२०, भोर-७०७, मावळ-३५०, चिंचवड- १ हजार ७२, पिंपरी-४७७, भोसरी-८२, वडगाव शेरी-३४७, शिवाजीनगर-३८२, कोथरूड-१८७, खडकवासला-६५१, पर्वती-१२७, हडपसर विधानसभा मतदारसंघात २९१ असे एकूण ८ हजार २७२ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beetroot Chips Recipe: घरच्या घरी मुंलासाठी बनवा पौष्टिक बीटरुट चिप्स

Tejpatta Tea Benefits: तमालपत्राचा चहा पिण्याचे आहेत आरोग्यदायी फायदे!

Baramati News : बारामतीचा वाली कोण? अजित पवारांचं मोठं विधान, पाहा Video

Priyanka Gandhi : जातनिहाय जनगणनेसाठी काँग्रेस आक्रमक; प्रियंका गांधींचे PM मोदींना ओपन चॅलेंज

Walnut: दूध की पाणी? अक्रोड कशात भिजवून खाणे जास्त फायदेशीर

SCROLL FOR NEXT