Parambir Singh: कोर्टानं फरार घोषित केलेले परमबीरसिंह अखेर मुंबईत परतले  Saam Tv
मुंबई/पुणे

Parambir Singh: कोर्टानं फरार घोषित केलेले परमबीरसिंह अखेर मुंबईत परतले

खंडणी प्रकरणामधील गुन्हा नोंदविण्यात आले आणि मे महिन्यापासून गायब झालेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह अखेर मुंबईत दाखल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : खंडणी प्रकरणामधील गुन्हा नोंदविण्यात आले आणि मे महिन्यापासून गायब झालेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Commissioner Police Parambir Singh)अखेर मुंबईमध्ये (mumbai) दाखल झाले असल्याची माहिती समोर येत आहे. मागील अनेक दिवसांपासून परमबीर सिंह बेपत्ता होते. कोर्टाने त्यांना फरार घोषित केलेले परमबीर सिंह नेमके आहेत तरी कुठे? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. (former police commissioner parambir singh has finally arrived mumbai)

हे देखील पहा-

परमबीर सिंह चंदीगडमध्ये (Chandigarh) असल्याची माहिती बुधवारी मिळाली होती. आपण देशातमध्येच असून जीवाला धोका असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने Supreme Court अटकेपासून संरक्षण दिल्यास २ दिवसांत चौकशीला हजर राहणार आहेत, असे परमबीर यांनी कोर्टात वकिलामार्फत स्पष्ट केले होते. यानुसार कोर्टाने परमबीर यांना अटकेपासून संरक्षण देण्याचा निर्णय जाहीर करमुक्त आला होता.

कोर्टाच्या निर्णयानंतर परमबीरसिंह आज मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांच्यावर परमबीरसिंह यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. यानंतर ते मे महिन्यात रजेवर गेले होते. तेव्हापासून त्यांचा ठिकाणाचं नव्हता. त्यांच्याविरोधामध्ये खूपवेळा समन्स बजावल्यावर मुंबईमधील कोर्टाने मागील आठवड्यात त्यांना फरार घोषित केले होते. त्यामुळे परमबीर यांना सर्वोच्च न्यायालयात भूमिका स्पष्ट करावी लागली आहे.

Edited By- Digambar jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Update : राज्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; तुमच्या भागातील हवामानाचा अंदाज काय? वाचा

Satara Tourism : महाराष्ट्रातील 'मिनी काश्मीर' म्हणून ओळखलं जाणारं हे ठिकाण पाहिलं का? पावसाळ्यात दिसते अधिकच सुंदर

Akshay Kumar : अक्षय कुमारचे भीतीदायक हास्य तर सैफ अली खानच्या डोळ्यात आग; 'हैवान'चा फर्स्ट लूक आऊट, रिलीज डेट काय?

Maharashtra News Live Update: पीकविमा अर्जातील नव्या हमीपत्रामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

Mumbai Local: मुंबई हादरली! धावत्या लोकलमध्ये रक्तरंजित थरार, तिघांकडून तरुणावर कोयत्याने सपासप वार

SCROLL FOR NEXT