Thane NCP leaders join Shiv Sena  Saam TV Marathi News
मुंबई/पुणे

एकनाथ शिंदेंचा ZP मध्ये पवारांना धक्का, २ दिग्गजांसह सरपंचाने साथ सोडली, शिवसेनेत केला प्रवेश

Thane NCP leaders join Shiv Sena : ठाणे ग्रामीण आणि शहापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी जिल्हा परिषद कृषी सभापती, पंचायत समितीचे माजी सभापती आणि अनेक सरपंचांनी शिंदे गटात प्रवेश केला. आगामी निवडणुकांआधी शिंदे गटाची ताकद वाढली.

Namdeo Kumbhar

फय्याज शेख, शहापूर प्रतिनिधी

Sharad Pawar setback in Thane : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसले ठाणे ग्रामीणमध्ये जोरदार धक्का बसला आहे. ठाणे जिल्हा परिषद माजी कृषी सभापती आणि पंचायत समितीचे माजी सभापती यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यांनी शुक्रवारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या तोंडावर हा ठाण्यात पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जातोय.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर शहापूर तालुक्यात शरद पवारांना धक्का बसला आहे. ठाणे जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादीचे माजी कृषी सभापती संजय निमसे आणि शहापूर पंचायत समितीचे माजी सभापती यांच्यासह काही सरपंच व उपसरपंच यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेना नेते प्रकाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पक्ष प्रवेश झाला. यामुळे शहापूरमध्ये शिंदे गटाची ताकद वाढली आहे.

महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समितीची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्ष आपली ताकद वाढवत आहेत. त्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न सुरू आहेत. काही पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. असे असताना निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ठाणे जिल्हा परिषद माजी कृषी सभापती संजय निमसे व पंचायत समिती सभापती तसेच काही ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांचा प्रवेश होणे, म्हणजे शहापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची ताकद कमी होताना दिसत आहे. यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला याचा मोठा फटाका बसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मॅरेथॉनमध्ये धावले सोलापूरकर होम मैदान ते धावण्याच्या मार्गावर ‘सकाळ’चे कौतूक

Maharashtra Politics : निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; बड्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

Goan Style Recipe: रोज वरण भात खाऊन कंटाळा आलाय? मग जेवणाला बनवा गोवन स्टाईल आंबट बटाटा रस्सा, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Weather: राज्यात थंडी गायब, पाऊस हजर! हवामान विभागाचा नोव्हेंबरसाठी अंदाज काय? VIDEO

Tara Sutaria: लाल इश्क...; तारा सुतारियाचा बनारसी साडीतील रॉयल लूक

SCROLL FOR NEXT