Vanraj Andekar Saam Tv
मुंबई/पुणे

Vanraj Andekar: आधी गोळीबार, नंतर कोयत्याने वार; जीवघेणा हल्ल्यात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू

Pune Crime News: पुण्यात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.

Satish Kengar

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुण्यात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील नाना पेठेत रविवारी रात्री ही घटना घडली आहे. गोळीबाराच्या या हल्ल्यात आंदेकर यांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोरांनी त्यांच्यावर 5 राउंड फायर केल्याची प्रथमिक माहिती मिळत आहे. या गोळीबारात वनराज गंभीर जखमी झाले आहेत. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर फरार झाले आहेत.

वनराज आंदेकर यांच्यावर नाना पेठेत आधी गोळीबार करण्यात आला. नंतर हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्याच्या ते गंभीर जखमी झाले होते. गंभीर जखमी झालेले आंदेकर यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जिथे त्यांचा मृत्यू झाला.

घरगुती वादातून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, आंदेकर यांच्यावर हल्ला करण्याआधी हल्लेखोरांनी येथील चौकाची लाईट घालवली होती. यानंतर वनराज आंदेकर हे एकटेच असल्याचं पाहून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

आंदेकर यांच्या घरी कार्यक्रम होता. त्यांमुळे त्यांच्यासोबत नेहमी असणारे त्यांचे सहकारी यावेळी त्यांच्यासोबत नव्हते. नेमकी हीच संधी साधून दुचाकीवरून आलेल्या तीन ते चार जणांनी आधी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या नंतर त्यांच्यावर कोयत्याने वार केले.

दरम्यान, पुणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. पोलिसांकडून घटनेचा पंचनामा केला जात आहे. तसेच याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT