Sachin Waze :  Saam tv
मुंबई/पुणे

Anil Deshmukh Case : १०० कोटी वसुली प्रकरणाला नवं वळण; सचिन वाझेचा मोठा आरोप, जयंत पाटलांचेही घेतले नाव

Sachin Waze on jayant patil : सचिन वाझेच्या आरोपाने राजकारणात भूकंप येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात अनिल देशमुखांसहित जयंत पाटील यांचंही नाव असल्याचं वाझेने सांगितलं.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : १०० कोटी खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझेने अनिल देशमुख यांच्या गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, त्याचे पुरावे सीबीआयकडे दिल्याचे सचिन वाझेने म्हटलं. याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिल्याचेही सचिन वाझेने सांगितले. या पत्रात जयंत पाटील यांचंही नाव असल्याचं सचिन वाझे याने म्हटलं आहे. अंटेलिया, मनसुख हिरेन आणि १०० कोटी प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझेच्या आरोपांमुळे राजकारणात भूकंप येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सचिन वाझेला वैद्यकीय चाचणीसाठी जे जे रुग्णालयायत नेताना त्याने माध्यमांना माहिती दिली. १०० कोटी प्रकरणातील मुख्य आरोपी निलंबित पोलीस अधिकारी आणि तुरुंगात असलेला सचिन वाझेने अनिल देशमुख यांच्यानंतर जयंत पाटील यांच्यावर बोट केलं आहे. काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांनी समित कदम आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते. 'मला ईडीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी कथित ऑफर ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडून समित कदम घेऊन आला होता, असा आरोप देशमुखांनी केला होता.

अनिल देशमुखांनी आरोप केल्यानंतर १० दिवसातच नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. सदर प्रकरणात समित कदम यांच्यानंतर जयंत पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे. वाझेने जयंत पाटील यांच्यावर आरोपाचा ठपका ठेवल्याने नवा वाद समोर निर्माण झाला आहे. दोन महिन्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकाही वाझे प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

सचिन वाझेने लिहिलेल्या पत्रात अनिल देशमुख यांच्यासहित जयंत पाटील यांच्या नावाचाही समावेश असल्याचे कळत आहे. जयंत पाटील यांच्यासहित इतर नेत्यांचेही नावे असल्याची माहिती समोर येत आहे. सचिन वाझेने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात जयंत पाटील यांच्या विरोधात काय आरोप केले, हे अद्याप समोर आलेले नाही.

जयंत पाटील यांच्यासहित या पत्रात इतर कोणत्या नेत्यांची नावे आहे का, हे देखील कळू शकलेले नाही. सचिन वाझेच्या देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रामुळे राजकारणात खळबळ उडण्याची शक्यता आहे. वाझेने देवेंद्र फडणवीसांना लिहिलेलं पत्र अद्याप हाती लागलेलं नाही. सचिन वाझेच्या आरोपानंतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

SCROLL FOR NEXT