Jayant Patil News : महाराष्ट्रात सर्वात मोठा डांबर घोटाळा; जयंत पाटील यांचा गंभीर आरोप, पुरावेही दिले

Jayant Patil on asphalt scam : महाराष्ट्रात सर्वात मोठा डांबर घोटाळा झाल्याचा आरोप शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गंभीर आरोप केला आहे. जयंत पाटील यांनी घोटाळ्याचे पुरावेही दिले आहेत.
Jayant Patil: मंत्र्यांच्या वरदहस्ताने डांबरच्या बिलातून उकळले कोट्यवधी रुपये; जयंत पाटील यांनी उघड केला डांबर घोटाळा
Jayant Patil On Farmers Saam Tv
Published On

रुपाली बडवे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम विभागात डांबर घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी केला आहे. विधानसभेत पुरवणी मागणीवरील चर्चेदरम्यान जयंत पाटील यांनी गंभीर आरोप केला आहे. मंत्र्याच्या वरदहस्ताने डांबरच्या बिलातून शेकडो कोटी रुपये उकळल्याचा आरोप जंयत पाटील यांनी केला आहे.

आर. डी. सामंत कन्ट्रक्शन नावाच्या कंपनीने शासकीय कामांचे कंत्राट घेतले आहे. सरकारमधील एका मंत्र्यांचे सगेसोयरे कंपनीत कार्यरत आहेत. या कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी, नॅशनल हायवे इत्यादी विभागांमधील कामे घेऊन घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या कंपनीने केलेल्या कामांचे उदाहरण शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी दिले आहे.

पहिले उदाहरण

कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रत्नागिरीतील रेवस रेड्डी रोडचं रुंदीकरण आणि डांबरीकरणाचं काम करण्यात आलं आहे. या डांबराच्या बिलाचा नंबर आणि रत्नागिरी एमआयडीसी पाणीपुरवठा योजनेंतर्गत ॲप्रोच रोड ते जॅकवेलपर्यंत जाणाऱ्या डांबरी रस्त्याचे नुतनीकरण करण्यात आलं आहे. त्या डांबराच्या बिलाचा नंबर एकच असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. दोन्ही कामांसाठी एकच डांबर बील वापरून पैसे काढून काम झाल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. या बिलाचा नंबर BPCL 4582111044 हा आहे.

Jayant Patil: मंत्र्यांच्या वरदहस्ताने डांबरच्या बिलातून उकळले कोट्यवधी रुपये; जयंत पाटील यांनी उघड केला डांबर घोटाळा
Maharashtra Politics: हाथरस दुर्घटनेनंतर गुन्हा, मग खारघर दुर्घटनेत का नाही? भाविकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? संजय राऊत आक्रमक VIDEO

•दुसरे उदाहरण

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केलेल्या रस्ता रुंदीकरण आणि ब्लक टॉपिंग काम करण्यात आलं. या कामसाठी वापरलेल्या डांबराचे पावती क्रमांक 4582165210 हा आहे. MIDC अंतर्गत रत्नागिरी पाणी पुरवठा योजना अंतर्गत हार्चेरी जॅकवेलपर्यंत जाणारा ॲप्रोच रस्ता पुर्नडांबरीकरणाचे काम करण्यात आलं. या डांबराचा बिलाचा नंबर एकच असल्याचा आरोप केला आहे. दोन्ही कामसाठी एकच डांबर बील वापरण्यात आले आहे. त्यातून पैसे काढल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे

•तिसरे उदाहरण

२०२३ साली एप्रिल महिन्यातही सार्वजनिक बांधकामाकडून निवळी जयगड या रस्ता कामासाठी वापरुन संपवलेल्या डांबराच्या बिलाचा वापर करण्यात आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. त्यानंतही पुन्हा असाच प्रकार केला.

1) Rehabilitation & Upgradation of NH-66 (Old NH-17) कांटे ते वालकेड 2)Rehabilitation & Upgradation of NH-66 (Old NH-17)अरावली ते कांटे या दोन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कामांसाठी दाखवून 8 कोटी 52 लाख 53 हजार 641 रुपये उकळल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

टेंडरमधील अटी आणि शर्तीनुसार अभियंता डांबराचा वापर दाखवतो. त्यावेळी ठेकेदार ओरीजनल बिलावर क्रॉस करुन कार्यालयाचा सही शिक्का मारतो. पुढे त्याची झेरोक्स ठेकेदाराला इतर लेखाजोखा ठेवण्यासाठी परत द्यावयाची असते.

एप्रिल, २०२३ महिन्यात डांबराची बिले उपअभियंता सा.बां. उप विभाग क्र.१ यांनी वापरली. त्यावेळी बील क्रॉस न करता ओरिजनल डांबराची बिले ठेकेदाराला परत केली. त्यानंतर तीच ठेकेदाराने राष्ट्रीय महामार्गावर वापरुन न केलेल्या कामाच्या बिलाची रक्कम घेतलेल्या आहेत. या सर्व कामामध्ये संगमताने साडे आठ कोटींपेक्षा जास्त रक्कमेचा अपहार झाल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

Jayant Patil: मंत्र्यांच्या वरदहस्ताने डांबरच्या बिलातून उकळले कोट्यवधी रुपये; जयंत पाटील यांनी उघड केला डांबर घोटाळा
Vidhan Sabha Election : मोठी बातमी! विधानसभेची निवडणूक महायुती एकत्रित लढवणार; अजित पवार गटाला किती जागा मिळणार?

जयंत पाटील यांनी कंपनीकडून शकडो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. तसेच या प्रकरणात अनेक अधिकारीही सामील झाले असून तेही तितकेच जबाबदार असल्याचा त्यांचा आरोप आहे. या प्रकरणी अधिकाऱ्यांवर व ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. या कामांची चौकशी करावी. त्याचबरोबर कंपनीवर व दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी करण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com