NARENDRA PAWAR BOOKED IN ALLEGED saam tv
मुंबई/पुणे

भाजपचे माजी आमदारावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा; पीडितेच्या जीवाला धोका असल्याचा दावा

Narendra Pawar Latest News: भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलिस शैलेश पाटील यांच्याविरोधात भिवंडीतील पडघा पोलीस ठाण्यात कथित सामूहिक बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

Omkar Sonawane

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

सामूहिक बलात्काराचा आरोप असलेले भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलिस शैलेश पाटील यांच्या विरोधात भिवंडीतील पडघा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांनी आरोपींना अद्याप अटक केलेले नाही. पीडितेची सोशल मीडिया बदनामी सुरु असून तिच्या जीविताला धोका आहे,अशी माहिती या प्रकरणाला वाचा फोडणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेतील काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी दिली आहे.

हे प्रकरण आरोपींकडून दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकरणातील बडतर्फ पोलिस पाटील याच्याकडील सर्व्हिस रिव्हॉल्व्हर पोलिसांनी जप्त केलेले नाही. त्याचा परवाना देखील रद्द करण्यात आलेला नाही. पीडिता एका सामाजिक संस्थेकडे दाद मागण्यासाठी गेली असता तिच्यावर दबाव आणला गेला. अखेरीस पीडिता कुलकर्णी यांच्या संपर्कात आल्यावर पीडितेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

त्यानंतर संंबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितेच्या शरीरावर जखमा आहेत. तिला रुग्णालयात दाखल करुन तिच्यावर उपचार करण्याची गरज असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure : ऑक्टोबरच्या कडक उन्हात वाढतो हाय BP चा धोका, 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Maharashtra News Live Update: मुंबईतील प्रसिद्ध मुंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी

Bike engine oil: किती किलोमीटर्सनंतर बदलायचं बाईकचं इंजिन ऑईल?

Tube tyres vs tubeless tyres: ट्यूबलेस टायर आणि ट्यूब टायर यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे?

IPS Transfer : प्रशासनात मोठा बदल! ५ IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

SCROLL FOR NEXT