Mumbai Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News: अंतर्वस्त्रात लपवून आणले ९ कोटींचे ड्रग्ज; महिलेची झाडाझडती घेताच अधिकारीही चक्रावले

Mumbai Crime News: महिलेने अंतर्वस्त्रात ८९० ग्रॅम ड्रग्ज लपवून आणले होते. या ड्रग्जची किंमत तब्बल ९ कोटी रुपये असल्याचं समोर आलं.

Satish Daud

Mumbai Latest Crime News

मागील काही महिन्यांपासून मुंबईसह राज्यात अंमली पदार्थ तस्करी आणि विक्रीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हीच बाब लक्षात घेता पोलिसांनी तस्करांविरोधात विशेष मोहिम हाती घेतली आहे. तरी देखील तस्कर वेगवेगळ्या शक्कल लढवत आहेत. मंगळवारी (१९ डिसेंबर) महसूल गुप्तचर संचालनालयाने मुंबई विमानतळावर एका परदेशी महिलेला बघितलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या महिलेला पाहून अधिकाऱ्यांना संशय आला. तिला थांबवून झाडाझडती घेतली असता, अधिकारी देखील चक्रावून गेलेत. महिलेने अंतर्वस्त्रात ८९० ग्रॅम ड्रग्ज लपवून आणले होते. या ड्रग्जची किंमत तब्बल ९ कोटी रुपये असल्याचं समोर आलं.

हा संपूर्ण प्रकार उघडकीस येताच अधिकाऱ्यांनी महिलेला तातडीने अटक केली. अधिकाऱ्यांच्या या धाडसी कारवाईचं सर्वस्तरातून कौतुक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेली महिला युगांडा देशातील रहिवासी आहे.

मंगळवारी ही महिला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली होती. दरम्यान, या महिलेला पाहून अधिकाऱ्यांना संशय आला. त्यांनी तात्काळ तिला थांबवत तिची झाडाझडती घेतली असता, महिलेने डोक्यावरील विगमध्ये तसेच अंतर्वस्त्रात ड्रग्ज लपवून आणल्याचे उघड झाले.

अंमली पदार्थ तस्करीसाठी महिलेने लढवलेली ही अनोखी शक्कल पाहून डीआरआयचे अधिकारी देखील चकित झाले. त्यांनी तातडीने या महिलेला ताब्यात घेतली. सध्या अधिकारी तिची कसून चौकशी करत असून महिलेमागे नेमका कुठल्या टोळीचा हात आहे, याचाही शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेसेनेचं महापौरपदासाठी ऑपरेशन टायगर? ठाकरेसेनेचे मुंबईतील नगरसेवक फोडणार?

Maharashtra News Live Update: अमरावतीत जिल्हा स्त्री रुग्णालयातील घटना दुर्दैवी,दोषींवर कारवाई होणारच: बावनकुळे

'मेस्सी'वादळ शमलं...! जगज्जेत्या खेळाडूची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा

पावसाची पाठ, खरिपाचा घात; राज्यातील अनेक जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट

शिळ्या भातात काय प्रक्रिया होते? शरीरासाठी फायदेशीर असतं की नुकसानकारक?

SCROLL FOR NEXT