Sharad Pawar Group Symbol News Saam Tv
मुंबई/पुणे

Sharad Pawar News: पिपाणी 'बंद', तुतारी वाजणार! शरद पवार गटाला आयोगाचा मोठा दिलासा; पिपाणी चिन्ह गोठवलं

Tanmay Tillu

निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांच्या चिन्हांमधून पिपाणी आणि तुतारी ही दोन चिन्ह गोठवलीयत. दिंडोरीत शरद पवारांचा उमेदवार विजयी झाला. मात्र अपक्ष उमेदवाराच्या पिपाणीलाही लाखापेक्षा जास्त मतं मिळाल्यामुळे शरद पवार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.

काही मतदारसंघांमध्ये तर पिपाणीमुळे तुतारीचा उमेदवार पराभूत झाल्याचाही दावा शदर पवारांच्या राष्ट्रवादीनं केला होता. त्यामुळे पिपाणी आणि तुतारी ही चिन्ह रद्द करण्यात यावं अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. त्यांच्या या मागणीनंतर निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांच्या चिन्हांमधून पिपाणी हे चिन्ह गोठवलंय. दरम्यान, लोकसभेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पिपाणीचा कुठे कसा फटका बसला होता, ते जाणून घेऊ..

लोकसभेत फटका, विधानसभेत दिलासा

सातारा : पिपाणीला 37 हजार 62 मतं, शरद पवारांच्या उमेदवाराचा 32 हजार मतांनी पराभव.

दिंडोरी : पिपाणीला 1 लाख 3 हजार मतं

बीड: पिपाणीला 54 हजार 850 मतं

बारामती : पिपाणीला 14 हजार 917 मतं

शिरुर: पिपाणीला 28 हजार 330 मतं

अहमदनगर: पिपाणीला 44 हजार 597 मतं

माढा: पिपाणीला 58 हजार 421 मतं

भिवंडी : पिपाणीला 24 हजार 625 मतं

रावेर: पिपाणीला 43 हजार 982 मतं

वर्धा: पिपाणीला 20 हजार 795 मतं

या सर्व मतदारसंघांमध्ये सर्वाधिक चर्चेत ठरला तो दिंडोरीचा निकाल. पवारांचे उमेदवार असलेले भास्कर भगरेंचा विजय झाला खरा मात्र त्यांचं नाव साधर्म्य असलेल्या आणि पिपाणी हे चिन्ह असलेल्या अपक्ष उमेदवाराला लाखभर मतं मिळाली त्यामुळे हा भगरे पॅटर्न म्हणून या निकालाची चर्चा झाली. काय आहे भगरे पॅटर्न..

काय आहे 'भगरे पॅटर्न'?

दिंडोरीत भास्कर भगरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. नावसाधर्म्य असलेल्या अपक्ष बाबू भगरेंनाही 1 लाख 3 हजार मतं मिळाली. बाबू भगरेंचं निवडणूक चिन्ह पिपाणी होतं. पिपाणी आणि तुतारीमध्ये साम्य असल्यानं मतं मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे.

ग्रामीण भागात तुतारी आणि पिपाणी यात फरक कळला नाही. त्यामुळं साता-यातला विजय निसटला असा दावाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं केला होता. आगामी विधानसभा निवडणुकीत पिपाणी आणि तुतारी फटका तुतारी वाजवणाऱ्या माणसाला बसू नये यासाठी पवारांनी आयोगात धाव घेतली होती. आता आयोगानं ही चिन्ह गोठवल्यामुळे त्या त्या मतदारसंघातील विरोधी उमेदवारांना पवारांचे उमेदवार रोखण्यासाठी नवी रणनीती आखावी लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात! ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

SCROLL FOR NEXT