Nitin Gadkari Saam TV
मुंबई/पुणे

Pune News : पुण्यातील बस आता हवेत उडणार?; गडकरींचा VIDEO व्हायरल

पुण्यातही वाहतूकीचा प्रश्न उपस्थित होत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Pune Bus News : राज्यातील प्रमुख शहरात सध्या वाहतुकीची समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी सर्वच महानगर पालिका आणि स्थानिक प्रशासन प्रयत्न करताना दिसत आहे. पुण्यातही (Pune) वाहतूकीचा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) भन्नाट उपाय सांगितला आहे. पुण्यात उडत्या बसेसची योजना आणली तर, वाहतूकीची समस्या कमी होणार असं गडकरी म्हणाले. (Nitin Gadkari Pune News)

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी सध्या पुणे दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक समस्येचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारपरिषद घेत त्यांनी पुण्यातील वाहतूकीच्या समस्येवर भन्नाट उपाय सांगितला. यावेळी त्यांनी पुण्यात उडत्या बसेसचा उल्लेख केला. पुण्यातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी नव्या योजनांवर काम सुरू असल्याचं सांगितलं.

काय म्हणाले नितीन गडकरी?

केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या नवनवीन कल्पना नेहमीच मांडत असतात. पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी गडकरींनी आता पुण्यात हवेतील बस सेवा सुरू करण्याचं म्हटलं. पब्लिक ट्रान्सपोर्ट ऑन इलेक्ट्रिसिटी ज्यामधे रोपवे, केबल कार व्हर्नाक्युलर रेल्वेचा समावेश होतो ही जबाबदारी आपल्याकडे सोपवावी, अशी सुचना गडकरींकडून चंद्रकांत पाटील यांना करण्यात आली. (Nitin Gadkari Today News)

महाराष्ट्रात आपण १६५ रोप वे केबल कार उभारणार असल्याचं गडकरींनी म्हटलंय. त्यामध्ये एकावेळेस १५० जण प्रवास करु शकणार आहेत. आपल्याकडे हवेतून चालणाऱ्या बसचा पर्याय उपलब्ध आहे असं गडकरी म्हणालेत. आपण हा पर्याय पुण्याच्या लोकप्रतिनिधींसमोर ठेवल्याचही त्यांनी म्हटलंय.

याशिवाय दोन बस एकमेकांना जोडल्या जातात अशा ट्रॉली बसचा पर्यायही आपल्याकडे उपलब्ध असल्याच त्यांनी म्हटलंय. हवेतील बसमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न बर्‍यापैकी सुटु शकतो असं गडकरी म्हणालेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT