"बदलापुरातील पूर नियंत्रण रेषेचा निर्णय एकतर्फी!" अजय दुधाणे
मुंबई/पुणे

"बदलापुरातील पूर नियंत्रण रेषेचा निर्णय एकतर्फी!"

भाजपनं व्यक्त केली पूर नियंत्रण रेषेबाबत नाराजी

अजय दुधाणे

बदलापूर - उल्हास नदीला येणाऱ्या पुराच्या पार्श्वभूमीवर यावर्षी पाटबंधारे विभागानं बदलापूर शहराला नवी पूर नियंत्रण रेषा जाहीर केली आहे. मात्र शहराच्या आत दीड किलोमीटरपर्यंत आलेली ही रेड आणि ब्लू लाईन अन्यायकारक असल्याची भावना भाजपनं व्यक्त केली आहे.

यंदाच्या पावसाळ्यात बदलापूर शहरात पूरपरिस्थिती उद्भवली. शहरात आतापर्यंत उल्हास नदीचं पाणी घुसल्यानं याची पाटबंधारे विभागानं दखल घेतली आणि जीपीएस, तसंच एरियल सर्व्हेच्या मदतीनं नवीन रेड लाईन, ब्लू लाईन जाहीर केली.

हे देखील पहा -

दरम्यान, चिपळूणला सुद्धा पुराचा फटका बसल्याने तिथेही पाटबंधारे विभागानं पूर नियंत्रण रेषा नव्यानं जाहीर केली. मात्र तिथे सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या. प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. मात्र बदलापूरात कुणालाही विश्वासात न घेता थेट जीपीएस आणि एरियल सर्व्हेच्या माध्यमातून ही रेषा जाहीर करण्यात आली असून यात मोठ्या प्रमाणात चुका असल्याचा आरोप भाजपनं केला आहे. २१ ठिकाणी उंच भाग, टेकड्या, पूर न येणारे भाग हे पूर नियंत्रण रेषेच्या आत दाखवण्यात आले आहेत.

या एकतर्फी निर्णयामुळे बदलापूरच्या विकासात मोठे अडथळे निर्माण होणार असून अनधिकृत बांधकामं फोफावतील, अशी भीती भाजपचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी व्यक्त केली आहे. बदलापूर शहरातही चिपळूणप्रमाणे प्रत्यक्ष सर्व्हे करून, हरकती आणि सूचना मागवून मगच पूर नियंत्रण रेषेबाबत निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी भाजपचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी केली आहे. त्यामुळं आता पाटबंधारे विभाग काय निर्णय घेतो, हे पाहावं लागणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकच्या मुंबई नाका परिसरात बर्निंग कारचा थरार

Pune Crime: मॅट्रोमोनी साइटवर ओळख, लग्नाचं आमिष दाखवत बलात्कार; प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत...

Gaganbawda Ghat : सिंधुदुर्ग-कोल्हापूरला जोडणारा गगनबावडा घाट १२ सप्टेंबरपर्यंत वाहतुकीस बंद; प्रवाशांचे हाल; नेमकं कारण काय?

Revised ITR: रिवाइज्ड आयटीआर म्हणजे काय? कोणाला भरता येतो? वाचा सविस्तर

iPhone 16 Pro: आयफोन १६ प्रोच्या किंमतीत मोठी सूट; यूजर्ससाठी सुवर्णसंधी, आताच खरेदी करा

SCROLL FOR NEXT