सध्या सणांचा हंगाम सुरू झाला आहे. रक्षाबंधन आणि जन्माष्टमी, गणेशोत्सव, दसरा, दिवाळीची तयारी सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत लोकांनी आतापासूनच सणांची तयारी सुरू केली आहे. कामानिमित्त आणि शिक्षणासाठी कामानिमित्त घरापासून दूर असलेल्यांनी आधीच घरी परतण्यासाठी तिकिटे बुक केली आहेत. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विमान भाडे 25 टक्क्यांनी वाढलं आहे.
गणेशोत्सव आणि दिवाळी आणि महिना अडीच महिने बाकी असले तरी विमान तिकीट बुकिंग सुरू झालं आहे. वेगवान बुकिंगमुळे विमान तिकिटाच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. प्रवाशांची मोठी वाढती संख्याआणि फ्लाईट मात्र योग्य प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे तिकिटे महागली आहेत. फ्लाइट्सच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे. त्यातचं भाडे ठरवण्याची नवी पद्धत अवलंबण्यात आली आहे, त्यामुळे विमान तिकिटाचे दर वाढले आहेत.
यंदा ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान ६ दिवसांचा दिवाळी सण साजरा होत आहे. दिवाळीनिमित्त देशातील प्रमुख मार्गांवरील भाडे गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ टक्क्यांनी वाढले आहे. काही विमानांची तिकिटे 20 ते 30 हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहेत.
मुंबई ते चेन्नई या विमानाच्या तिकीटाची किंमत 5,000 रुपयांपेक्षा अधिक आहे, तर गेल्या वर्षीचे भाडे सुमारे 4,400 रुपये होते.
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्यांना यावेळी तिकीट बुकिंगसाठी ३८१२ रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबई-गोवा विमान प्रवासाटीचे तिकिट 2023 मध्ये 3294 रुपये होते. यावेळी त्यात 15.7 टक्के वाढ झाली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत मुंबई ते जयपूरचे भाडे १६.१ टक्क्यांनी वाढले आहे. २०२३ मध्ये मुंबई ते जयपूरला जाण्यासाठी ५५६२ रुपये तिकीट मिळत होते, तर यंदा तिकीट ६४५८ रुपये झालं आहे. मात्र नोव्हेंबरसाठी मुंबई-जयपूर मार्गावरील नियोजित फ्लाइटची संख्या 154 असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 6.7 टक्क्यांनी कमी आहे.
दिवाळीत मुंबई ते हैदराबाद प्रवास करण्यासाठी ५०८१ रुपये मोजावे लागणार आहेत. मागील वर्षी हेच तिकिट ४२६८ रुपये होते. मुंबई ते हैदराबाद विमान तिकिटात यंदा २०.९ टक्के वाढ झाली आहे. मुंबई ते हैद्राबाद मार्गावर कमी उड्डाणे असल्यानेही समस्या वाढल्या आहेत. 2023 मध्ये दिवाळीच्या आठवड्यात या मार्गावर 266 उड्डाणे झाली होती. मात्र यंदा उड्डाणे ३ टक्के कमी आहेत, म्हणजेच भाडे आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.