उद्या 1 डिसेंबरपासून 'हे' पाच नियम बदलणर! (Video) Saam Tv
मुंबई/पुणे

उद्या 1 डिसेंबरपासून 'हे' पाच नियम बदलणर! (Video)

प्रत्येक नवीन महिन्याच्या पहिल्या तारखेला नवीन नियम लागू होतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - उद्या म्हणजेच 1 डिसेंबर 2021 पासून दैनंदिन आयुष्याशी संबंधित काही नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. या बदलांमध्ये गॅस सिलिंडरचे दर, यूएएन (UAN) आणि आधार लिंकिंग, होम लोन ऑफर, एसबीआय (SBI) क्रेडिट कार्ड, लाइफ सर्टिफिकेट इत्यादींचा समावेश आहे. प्रत्येक नवीन महिन्याच्या पहिल्या तारखेला नवीन नियम लागू होतात.

गॅस सिलिंडरचे दर

व्यावसायिक आणि घरगुती सिलिंडरचे नवीन दर प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला निश्चित केल्या जातात. त्यामुळे उद्या म्हणजेच 1 डिसेंबरपासून या महिन्यासाठीचे नवीन दर जाहीर केले जातील.

आधार आणि यूएएन लिंकिंग

तुम्ही जर नोकरी करत असाल आणि तुमच्याकडे ईपीएफचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर असेल, तर 30 नोव्हेंबरपर्यंत तो आपल्या आधार क्रमांकाशी लिंक करणे महत्वाचे असणार आहे. कारण 1 डिसेंबर 2021 पासून कंपन्यांना फक्त अशाच कर्मचाऱ्यांचे ईसीआर दाखल करण्यास सांगण्यात आले आहे, ज्यांचे यूएएन आणि आधार लिंकिंग व्हेरिफाय झाले आहे.

होम लोन ऑफर

अनेक बँकांनी होम लोनच्या विविध आणि आकर्षक ऑफर्स आणल्या होत्या. त्यामध्ये प्रोसेसिंग फी माफी, कमी व्याजदर यांचा समावेश होता. काही बँकांची ऑफर्स 31 डिसेंबर रोजी संपणार असली तरी एलआयसी हाउसिंग फायनान्सची ऑफर 30 नोव्हेंबरला संपणार आहे.

एसबीआय क्रेडिट कार्ड

तुम्ही जर एसबीआयचे क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर 1 डिसेंबरपासून एसबीआयच्या क्रेडिट कार्डने EMI वर खरेदी करणं महागणार आहे. अगोदर EMIवर फक्त व्याज द्यावं लागतं होतं मात्र उद्यापासून यावर प्रोसेसिंग फी द्यावी लागणार आहे.

लाइफ सर्टिफिकेट

तुम्ही पेन्शनधारक असाल तर तुम्हाला लाइफ सर्टिफिकेट जमा करणे बंधनकारक असणार आहे. पेन्शनधारकांनी त्यांचे लाइफ सर्टिफिकेट सादर करावे अन्यथा 1 डिसेंबरपासून पेन्शन मिळणं बंद होणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raju Patil : ठाणे ते कल्याणचा प्रवास हेलिकॉप्टरने, रस्त्याने पलावा पूलाची परिस्थिती बघितली असती; राजू पाटलांचा शिंदेंना टोला

Maharashtra Live News Update :तीन दिवसांपूर्वी उद्घाटन झालेला पलावा पूल पुलावरील रस्त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत

Amla Chutney : जेवणासोबत रोज लोणचं कशाला? घरीच करा चटपटीत आवळ्याची चटणी

OYO Hotel: कपल्सची होणार गोची? तासांवर रूम मिळणं होणार कठिण? VIDEO

Nagpur Tourism : नागपूरमधील विरंगुळ्याचे ठिकाण, 'येथे' घ्या क्षणभर विश्रांती

SCROLL FOR NEXT