Atal Setu Latest News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Atal Setu : अटल सेतूमुळे आमचं उत्पन्न घटलं, मच्छिमार संघटनेची हायकोर्टात धाव; नुकसान भरपाईची मागणी

Atal Setu Mumbai High Court Petition : अटल सेतूमुळे मासेमारीवर परिणाम झाला असून वाशी खाडीतील तब्बल 60 टक्के मासे कमी झाल्याचा आरोप मच्छिमार संघटनांनी केला आहे.

Satish Daud

अटल सेतूमुळे मासेमारीवर परिणाम झाला असून वाशी खाडीतील तब्बल 60 टक्के मासे कमी झाल्याचा आरोप मच्छिमार संघटनांनी केला आहे. आमचं उत्पन घटल्यामुळे सरकारने आम्हाला नुकसानभरपाई द्यावी, असं म्हणत मच्छिमार संघटनेने मुंबई हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली आहे.

या याचिकेवर येत्या 28 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. मरी आई मच्छिमार सहकारी संस्थेच्या वतीनं ही याचिका (Mumbai High Court) दाखल करण्यात आली आहे. वाशीगाव, जुहूगाव, कोपरखैराणे, घणसोली, गोठीवली, दिवा व बेलापूर येथील कोळीवाड्यांचा देखील याचिकेत समावेश आहे.

यावर न्यायमूर्ती बी.पी. कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनावाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. मुंबईला नवी मुंबईशी (Navi Mumbai) जोडणाऱ्या अटल सेतूच्या 21.8 किमी पुलाचं बांधकाम साल 2018 पासून सुरु झालं. तेव्हापासूनच येथील समुद्रातून मच्छी कमी होत गेली, असा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे.

मासेमारी हा आमचा पारंपारिक व्यवसाय आहे. गेली अनेक वर्षे आम्ही याच खाडीत मासेमारी करत आहोत. मासेमारी हेच आमच्या उत्पन्नाचं स्त्रोत आहे. मात्र अटल सेतूमुळे आमच्या उपजिवेकवर परिणाम झाला आहे.

केवळ अटल सेतूच्याजवळ असलेल्या कोळीवाड्यांनाच सरकारच्या वतीने नुकसानभरपाई देण्यात आली आहे. नुकसानभरपाईच्या धोरणानुसार आम्हालाही ती मिळायलाच हवी, अशी प्रमुख मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : वरळी डोममध्ये राज ठाकरेंची व्हॅनीटी व्हॅन दाखल, पाहा व्हिडिओ

Nashik Accident : रिक्षाच्या धडकेत दोन वर्षीय बालकाचा मृत्यू ;घराच्या समोर खेळत असतांना घडला अपघात

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Akola Horror : अकोल्यात धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, चालकाकडून भंयकर कृत्यू, वाचून संताप येईल

Sarzameen : "यहां हर फैसला एक कुर्बानी है..."; इब्राहिम अली खानच्या 'सरजमीन'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT