Chitra Wagh: जनहित याचिकेच्या माध्यमातून राजकारण करू नका, चित्रा वाघ यांना हायकोर्टाने खडसावलं

Mombay High Court On Chitra Wagh: पुण्यातील तरुणीच्या कथित मृत्यूप्रकरणी शिंदे गटाचे नेते संजय राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ३ वर्षांपूर्वी जनहित याचिका दाखल केली होती.
Chitra Wagh: जनहित याचिकेच्या माध्यमातून राजकारण करू नका, चित्रा वाघ यांना हायकोर्टाने खडसावलं
Mombay High Court On Chitra WaghSaam Tv
Published On

सचिन गाड, मुंबई

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांना मुंबई हायकोर्टाने फटकारले आहे. 'जनहित याचिकेच्या माध्यमातून राजकारण करू नका.', असे मुंबई हायकोर्टाने चित्रा वाघ यांना खडसावून सांगितले. शिंदे गटाचे नेते संजय राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी चित्रा वाघ यांनी २०२१ मध्ये जनहित याचिका दाखल केली होती. ही याचिका कोर्टाने निकाली काढावी किंवा मागे घ्यावी अशी मागमी चित्रा वाघ यांनी केली होती. त्यानंतर हायकोर्टाने याप्रकरणावर बोलताना चित्रा वाघ यांना खडसावले.

पुणे येथे फेब्रुवारी २०२१ मध्ये इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून पडून एका तरुणीचा मृत्यू झाला होता. या तरुणीच्या कथित मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते संजय राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ३ वर्षांपूर्वी जनहित याचिका दाखल केली होती. मात्र ही याचिका कोर्टाने निकाली काढावी किंवा ती मागे घेण्याची मुभा द्यावी अशी मागणी चित्रा वाघ यांनी बुधवारी केली. त्यांच्या या बदललेल्या भूमिकेचा हायकोर्टाने चांगलाच समाचार घेतला आहे.

चित्रा वाघ यांच्यासारखे राजकारणी जनहित याचिकांच्या माध्यमातून राजकारण करत असून कोर्टाला त्यात विनाकारण ओढत आहेत, असे खडेबोल न्यायालयाने सुनावले आहेत. बदललेल्या राजकीय स्थितीनुसार तुमची भूमिका बदलते आणि राजकारण करण्यासाठी जनहित याचिकांचा माध्यम म्हणून वापर करून कोर्टाला त्यात ओढले जात आहे, असे मत व्यक्त हायकोर्टाने व्यक्त केले. तसंच, 'राजकारण करण्याचा हा मार्ग नाही आणि तो कधीही स्पृहणीय नाही.', असे ताशेरेही मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने ओढले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com