Acharya marathe college Saam Tv
मुंबई/पुणे

VIDEO: आधी हिजाबबंदी, आता ड्रेसकोडवरून चेंबूरमधील कॉलेजचा व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला?

Acharya marathe collegeआता बातमी आहे चेंबूरच्या आचार्य मराठे कॉलेजमध्ये लागू करण्यात आलेल्या अजब फतव्याची...या कॉलेजमध्ये पुन्हा एकदा ड्रेस कोडचा फतवा लागू करण्यात आलाय. ड्रेस कोडसंदर्भात कॉलेजकडून सूचना जारी करण्यात आल्यात. हिजाबबंदी नंतर ड्रेसकोडसाठी कॉलेजनं फतवा जारी केलाय.

Tanmay Tillu

हिजाब बंदीमुळे चर्चेत आलेल्या मुंबईच्या चेंबूरमधल्या आचार्य-मराठे कॉलेजने आणखी एक वादग्रस्त फतवा जाहीर केलाय. त्यानुसार यापुढे कॉलेजमध्ये येताना जीन्स किंवा टी शर्ट घालून विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये येता येणार नाही. ड्रेसकोड संदर्भात विशेष नियमावली महाविद्यालय प्रशासनानं जारी केलीये. एवढंच नव्हे तर निर्णयाबाबत माहिती नसल्यामुळे जिन्स टी-शर्ट घालून आलेल्या विद्यार्थ्यांना थेट घरीच पाठवण्याचा कारनामा कॉलेजनं केला.

याआधीही आचार्य-मराठे महाविद्यालयात हिजाब बंदी करण्यात आली होती. हिजाब बंदी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका विद्यार्थ्यांनी दाखल केली होती. मात्र, ही याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. त्य़ामुळे कॉलेजचा आत्मविश्वास चांगलाच वाढलेला दिसतो. म्हणूनच हिजाबनंतर आता जिन्स-टी-शर्टवर कॉलेजनं बंदी घातल्याचं दिसतंय. कॉलेजनं नेमकं कशाकशावर बंदी घातली आहे, हे जाणून घेऊ...

आचार्य कॉलेजच्या परिपत्रकात नेमकं काय ?

  • विद्यार्थ्यांनी धर्म आणि सांस्कृतिक विषमता दर्शवणारा पोशाख टाळावा

  • नकाब, हिजाब, बुरखा, टोपी, बॅच काढले जातील, नंतरच कॅम्पसमध्ये प्रवेश

  • फाटलेल्या जीन्स, टी-शर्ट, तोकडे कपडे आणि जर्सीवर बंदी

या परिपत्रकावर साम टीव्हीनं काही सवाल उपस्थित केलेत

  • कॉलेजमध्ये ड्रेस कोडची सक्ती कितपत योग्य?

  • ड्रेस कोड म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा नाही का?

  • ड्रेस कोडवरून विद्यार्थ्यांना घरी पाठवणं कॉलेजला शोभतं का?

कॉलेजमध्ये शिस्त असावी. मात्र त्याचा अतिरेक व्हायला नको. अन्यथा स्वातंत्र्याचा अभ्यास करता करता विद्यार्थ्यांना नियमांच्या जंजाळात पारतंत्र्याचा अनुभव यायला नको. त्यामुळे हा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावरच घाला आहे. म्हणून चेंबूरचं आचार्य-मराठे महाविद्यालय टीकेचं धनी ठरतंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT