Firing in Khadak area of Pune city one person dead accused absconding Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News: पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार; घरात घुसून एकाची हत्या, परिसरात खळबळ

Pune Crime News: पुण्यात रविवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास गोळीबार झाला आहे. या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

Satish Daud

Pune Crime News Today

विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. एकीकडे पुणे पोलीस गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत असताना दुसरीकडे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यात रविवारी मध्यरात्री गोळीबार झाला आहे. या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अमित साहू असं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

खडक परिसरातील सिंहगड गॅरेज चौकात ही घटना घडली आहे. या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अमित साहू याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. (Latest Marathi News)

गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाले असून पोलिसांकडून (Police) त्यांचा शोध घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमित साहू हा पुण्यातील खडक परिसरात राहतो. रविवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून त्याच्यावर गोळीबार केला. यामध्ये साहू याचा मृत्यू झाला.

स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच खडक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.

लग्नाचे अमिष दाखवून तरुणाची फसवणूक

पुण्यात लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाची २२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात तरुणीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वाघोली येथील एका ३० वर्षीय तरुणाने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी जय भगवान रोकडे (रा. संगमनेर, जि. अहमदनगर) याला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार अहिल्यानगरमध्ये दाखल

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

SCROLL FOR NEXT