Pune Fire News
Pune Fire News Saam tv
मुंबई/पुणे

Pune Fire News: मोठी बातमी! पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीला आग, अग्निबंब घटनास्थळी दाखल

Prachee kulkarni

Pune Fire News: पुण्यातून एक मोठं वृत्त हाती आलं आहे. पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. पुणे विद्यापीठाच्या जुन्या इमारतीला ही आग लागली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीच्या वृत्तानंतर अग्निबंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात विद्यापीठाच्या मुख्य इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. पुणे विद्यापीठातील जुन्या इमारतीला आग लागल्याची घटना घडली.

विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमधील लाकडी जिन्याला ही आग लागली. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याबद्दलची माहिती आलेली नाही. तसेच या आगीचं कारणही अद्याप अस्पष्ट आहे.

पुणे विद्यापीठाला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे अग्निबंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पोहोचताच आगीवर नियंत्रण मिळवायचं काम सुरु केलं. विद्यापीठात आग लागल्याची माहिती मिळताच विद्यार्थ्यांमध्ये एकच घबराट पोहोचली.

नवी मुंबईत एमआयडीसीत आग

दरम्यान, नवी मुंबईमधूनही आगीच्या घटनेचं वृत्त हाती आलं. नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीमध्ये प्लॉट नंबर डब्ल्यू १२७ मध्ये आग लागल्याची घटना घडली. कलर कंपनीच्या कंपनीच्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली.

कंपनीला आग लागली, त्यावेळी अनेक कर्मचारी गोदामात होते. मात्र, आग लागल्यानंतर सर्व कर्मचारी सुखरूप बाहेर आले. आगीची वार्ता कळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी असून आग विजवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट, उरुळी कांचनमध्ये दुकान फोडले; घटना CCTV मध्ये कैद

Beed Accident : चारचाकीची दुचाकी, बैलगाडीला धडक; एकाचा मृत्यू, ३ जण जखमी; बैलांचेही मोडले पाय

Viral Video : आधी महिला भिडल्या मग पुरुषांमध्येही झाली कुटाकुटी; सिटवरून ट्रेनमध्ये तुफान राडा

Gardening करण्याचे आरोगदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Today's Marathi News Live: अकोल्यात ट्रक आणि कारचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT