Mumbai News Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai News : धावत्या लोकल ट्रेनच्या चाकाला आग; प्रवाशांची पळापळ, थरकाप उडवणारा VIDEO

मध्ये रेल्वेच्या कसारा सीएसटी धावत्या लोकल ट्रेनच्या चाकाने अचानक पेट घेतला. यामुळे प्रवाशांची मोठी पळापळ झाली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumabi Local Train Fire : मध्ये रेल्वेच्या कसारा सीएसटी लोकल ट्रेनने पेट घेतला कसाराहून मुंबई सीएसटी कडे जात होती. कसाऱ्याहून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी ट्रेन ही कसाऱ्याहून सकाळी 8:18 ला सुटली होती. या घटनेचा थरकाप उडवणारा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ही ट्रेन (Train) असनगाव रेल्वे स्टेशना कडे जात असताना आसनगाव ब्रीज जवळ आल्यावर या ट्रेनमधून अचानक धूर निघायला लागला. यामुळे ट्रेन मध्ये बसलेल्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र 15 ते 20 मिनिटांनंतर पुन्हा ही ट्रेन मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे रवाना करण्यात आली. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ लोकलमधून अचानक धूर निघू लागला. त्यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी मध्येच लोकल थांबवली आणि खाली उतरले. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. मोठ्या प्रमाणात धूर येत असल्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. अनेक प्रवाशांनी लोकलमधून खाली उड्या टाकल्या. ब्रेकमध्ये घर्षण झाल्याने लोकलच्या चाकाला आग लागल्याचे समोर आले. त्यामुळे स्थानकावर एकच गोंधळ उडाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: डोकं शांत ठेवा! पैशांच्या अडचणी कमी होतील; वाचा आजचे राशीभविष्य

धमकीनंतरही बिग बींचा रविवारचा नियम कायम; चाहत्यांना भेटण्यासाठी शोधली भन्नाट शक्कल

Vastu Tips For Wall Clock: घरात घड्याळ कुठे लावावे? वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा कोणती?

Stylish Tops For Women: जीन्सवर कोणत्या प्रकारचे टॉप्स घालावेत? पाहा लेटेस्ट कलेक्शन

Jalgaon Firing: दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांकडून 25 वर्षीय तरुणावर बेछुट गोळीबार, भुसावळ हादरलं!

SCROLL FOR NEXT