Navi Mumbai Crime News : औरंगाबादच्या महिलेचा सानपाड्यात खून

या घटनेची माहिती मिळताच सानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला.
 Kalyan Crime News
Kalyan Crime NewsSaam TV

- सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai Crine News : नवी मुंबईतील (Navi Mumbai) सानपाडा (Sanpada) विभागात सायन पनवेल महामार्गा (sion panvel expressway) लगत सापडलेल्या मृतदेहाची माहिती समोर आली आहे. या महिलेची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मृत महिलेचे नाव आशा बोराडे (asha boarde) आहे.

 Kalyan Crime News
APMC Market Vashi : आंब्याच्या पेट्या दाखल, एपीएमसीत आनंदाचे वातावरण; जाणून घ्या दर

कोपरखैरणेतील खाडीकिनारी एका महिलेची हत्या झाल्याची घटनाताजी असतानाच सानपाडा सेक्टर- ३० मधील बागेत आशा आत्माराम बोरडे (वय ३३) या महिलेचा बुधवारी दुपारच्या सुमारास खून झाला. सानपाडा पोलिसांना घटनेची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला.

 Kalyan Crime News
Valentine's Day 2023 : मै तेरा बॉयफ्रेंड तू मेरी गर्लफ्रेंड..., सूत जुळताच लैंगिक संबंध ठेवले अन् पुढं घडलं अघटित

आशा या मूळच्या औरंगाबादच्या आहेत. सध्या त्या बेघर होत्या. त्यांच्या छातीत चाकू भोसकून हत्या करण्यात आली असावी असा अंदाज पाेलिसांनी बांधला आहे. तिच्याजवळ असणाऱ्या काही पैशांसाठी गर्दुल्यांकडून हे कृत्य करण्यात आले असावे अशी शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे. याप्रकरणी सानपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com