fire broke in swastik netralaya and maternity hospital ahmednagar  saam tv
मुंबई/पुणे

Ahmednagar Fire News : साई मिडास टच कॉम्प्लेक्सला भीषण आग, रुग्णालय जळून खाक (पाहा व्हिडिओ)

साई मिडस टच या कॉम्प्लेक्सला आग कशामुळे लागली हे स्पष्ट झालेले नाही. या आगीमुळे नगर- मनमाड महामार्गावर वाहतुकीची माेठ्या प्रमाणात काेंडी झाली आहे.

Siddharth Latkar

- सुशिल थाेरात

Ahmednagar News :

सावेडी येथील साई मिडास टच या कॉम्प्लेक्सला आज (मंगळवार) भीषण आग लागली. या आगीची माहिती कळताच अहमदनगर महापालिकेचे अग्निशामक दल घटनास्थळी रवाना झाले. प्राथमिक माहितीनूसार या आगीत एचडीबी फायनान्स आणि स्वास्तिक नेत्रालय हॉस्पिटल (swastik netralaya and maternity hospital ahmednagar) जळून खाक झाले आहे. (Maharashtra News)

साई मिडास टच या कॉम्प्लेक्सला आग कशामुळे लागली हे स्पष्ट झालेले नाही. ही आग माेठ्या प्रमाणात भडकल्याने आजूबाजूच्या दुकानांना त्याची झळ बसली. अहमदनगर महापालिकेचे अग्निशामक दलाने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आगीवर नियंत्रणासाठी मारलेल्या पाण्यामुळे आकाशात माेठ्या प्रमाणात धूर दिसू लागला.

या धूरामुळे लांब पल्ल्याहून नागरिक नेमकं काय झाले हे पाहण्यासाठी घटनास्थळी दाखल हाेत हाेते. यामुळे घटनास्थळी नागरिकांची गर्दी वाढतच हाेती. यामुळे नगर मनमाड महामार्गावरील वाहतुकीची काेंडी झाली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या आगीत नेमकं किती नुकसान झाले याची माहिती मिळू शकली नाही परंतु प्राथमिक माहितीनूसार या आगीत एचडीबी फायनान्स आणि स्वास्तिक नेत्रालय हॉस्पिटल जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raksha Bandhan: रक्षाबंधनाला भावाला चुकूनही 'या' रंगांच्या राखी बांधू नका, नाही तर...

Maharashtra News Live Update: अहेरीतील आरोग्य, आदिवासी विकासकामांना गती द्या; जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना

साखर महागली, ग्राहकांची पळापळ; बाजारात प्रतिव्यक्ती 1 किलोच साखर

TET Exam: आनंदाची बातमी! शिक्षकांची TET परीक्षेतून सुटका; विजय सरकारचा मोठा निर्णय

जनगणनेत OBC प्रवर्ग का नाही? राहुल गांधींचा पत्रातून पंतप्रधानांना सवाल

SCROLL FOR NEXT