Navi Mumbai Bus Navi Mumbai Bus Caught Fire
मुंबई/पुणे

Navi Mumbai Bus Fire: NMMT इलेक्ट्रॉनिक बसला अचानक आग, ड्रायव्हर आणि कंडक्टर थोडक्यात बचावले; नवी मुंबईतील घटना

Navi Mumbai Bus Fire: नवी मुंबईच्या ऐरोलीत इलेक्ट्रॉनिक बसला आग लागण्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

सिद्धेश म्हात्रे

E- Bus Caught Fire at Airoli:

नवी मुंबईच्या ऐरोलीतून एक मोठी घटना हाती आली आहे. नवी मुंबईच्या ऐरोलीत इलेक्ट्रॉनिक बसला आग लागण्याची घटना घडली आहे. ऐरोली स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जवळ ही घटना घडली आहे. या घटनेत ड्रायव्हर आणि कंडक्टर थोडक्यात बचावले आहेत. या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईच्या ऐरोली सेक्टर - ८ ए मध्ये एन.एम.एम.टी बसला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. ऐरोली स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सजवळ एन.एम.एम.टीच्या इलेक्ट्रॉनिक बसला ही आग लागली.

आग लागल्यानंतर रस्त्यावरील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. या बसमध्ये ड्रायव्हर आणि कंडक्टर होते. या बसमधील दोघे वेळीच बाहेर पडले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आग लागल्यानंतर स्थानिकांनी ऐरोली अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सदर बस ही डेपोला निघाली होती. बसमध्ये एकही प्रवासी नव्हता. बसमध्ये केवळ ड्रायव्हर आणि कंडक्टर होते. या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली आहे.

दरम्यान, आज मुंबईतील अंधेरीच्या मरोळ येथेही आग लागल्याची घटना घडली. मरोळ येथे एटीएम सेंटरला दुपारच्या सुमाराला आग लागली. या आगीत एटीएम सेंटर जळून खाक झाले. या एटीएममध्ये किती रक्कम होती, ती रक्कम जळून खाक झाली का, याबाबत नेमकी माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांनकडून मुक्ताईला साडी चोळीचा आहेर भेट

Genelia Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या सुनबाईंचा स्वॅग भारी!

Indian Railway : रेल्वेची आरक्षण यादी ८ तास आधी जाहीर होणार | VIDEO

Sanjay Raut : महाराष्ट्राच्या नादाला लागू नको नाहीतर पटकनी काय आहे ते दाखवू-राऊतांचा दुबेंना इशारा

Bribe Case : प्रसूती रजा मंजुरीसाठी मागितले ३६ हजार; मुख्याध्यापिकेसह लिपिक ताब्यात

SCROLL FOR NEXT