fire breaks out at largo pizzeria outlet in kharadi near pune  Saam Digital
मुंबई/पुणे

पुणे : खराडीमध्ये हाॅटेलला भीषण आग, अग्निशामक पथकाचे धाडस; 6 गॅस सिलिंडर बाहेर काढल्याने टळला माेठा धाेका

Pune Fire News : या आगीचे नेमके कारण समजले नाही. या आगीमध्ये दोन ओव्हन, सात फ्रिज, टिव्ही, कंप्यूटर, इलेक्ट्रीक वायरिंग व इतर साहित्य जळाले. या ठिकाणी कोणी जखमी वा जिवितहानी नाही.

Siddharth Latkar

- सचिन जाधव

खराडी (पुणे) येथी लार्गो पिझ्झा या हॉटेलमध्ये आज (शनिवार) पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत लाखाे रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान आगीवर पूर्ण नियंत्रण मिळाले असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती येरवडा अग्निशमन केंद्राच्या पथकाने दिली. (Maharashtra News)

खराडी येथील लार्गो पिझ्झा हॉटेलमध्ये आग लागल्याची माहिती ाटेच्या सुमारास मिळताच येरवडा अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन दलाचे पथक पाण्याच्या टॅंकरसह रवाना झाला. हे पथक घटनास्थळी पोहोचताच त्यांनी प्रथम हॉटेलमध्ये कोणी कामगार नसल्याची खात्री हॉटेल मालकांकडून केली. त्यानंतर आगीवर पाण्याचा मारा सुरु केला. सुमारे 20 मिनिटात आगीवर नियंत्रण मिळविले. त्यानंतर पथकाने कुलिंग ऑपरेशन सुरु ठेवले.

दरम्यान हॉटेलच्या भटारखान्यातून जवानांनी सहा गॅस सिलिंडर बाहेर काढल्याने मोठा धोका टळला. तसेच वेळीच आग विझवल्याने आग इतरत्र पसरली नाही. या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या आगीमध्ये दोन ओव्हन, सात फ्रिज, टिव्ही, कंप्यूटर, इलेक्ट्रीक वायरिंग व इतर साहित्य जळाले. या ठिकाणी कोणी जखमी वा जिवितहानी झाललेली नाही अशी माहिती अग्निशमन दलाच्या पथकाने दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 : मुंबईमध्ये विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये मजुरांना घेऊन जाणारे वाहन पलटी, १२ जण जखमी

Earthquake : अमरावतीमध्ये भूकंपाचे लागोपाठ २ धक्के, घरांतील भांडी पडली, नाल्याला भेगा

Nanded : गणरायाच्या विसर्जनासाठी उतरले नदीत; पाय घसरल्याने तिघेजण गेले वाहून, एकाला वाचवण्यात यश

Viral Video: बापरे...जीवघेणा स्टंट! तरुणाने चक्क पाण्यात जाऊन मासे नाही तर मगरीला पकडले, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT