Sukapur  सिद्धेश म्हात्रे
मुंबई/पुणे

सुकापूर येथील बालाजी सिम्फनी येथे लागलेली आग पैशाच्या वादातून; एकाला अटक

सुकापूर येथील बालाजी सिम्फनी इमारतीत लागलेल्या आगीत आता मोठा खुलासा झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सिद्धेश म्हात्रे

पनवेल: सुकापूर येथील बालाजी सिम्फनी इमारतीत लागलेल्या आगीत आता मोठा खुलासा झाला आहे. नवीन पनवेलमधील (Panvel) सुकापूर येथील बालाजी सिम्फनी इमारतीत (Symphony building) 28 व्या मजल्यावर आग लागली होती, यात एकाच मृत्यू झाला होता. याप्रकरणी आता एकाला अटक (Arrested) करण्यात आली आहे. (fire Balaji Symphony building Sukapur was sparked money dispute)

हे देखील पहा-

याठिकाणी राहत असणाऱ्या सरीता पताडे व गौरी केदारी राहत होते. यातील गौरी केदारी यांनी दोघांकडून सरकारी (Government) नोकरी लावण्याच्या बहाण्याने पैसे घेतले होते. मात्र, नोकरी लागत नसल्याने मोहिनी ढमढेरे व धनंजय आंद्रे या दोघांनी पैसे परत करण्याची मागणी केली होती. मात्र, प्रत्येक वेळी पैसे देण्यास गौरी टाळाटाळ करत होती.

अखेर मोहिनी आणि धनंजय यांनी गौरीचे घर गाठत तिला घाबरवण्यासाठी एक बाटलीमधून पेट्रोल (Petrol) व मेणबत्ती घेऊन गेले होते. मात्र, तेथे झालेल्या वादात गौरीनेच धनंजय जवळील पेट्रोलची बॉटल घेत ते स्वतःच्या अंगावर टाकले व मोहिनीच्या हातातील मेणबत्ती खेचण्याचा प्रयत्न करत असताना याठिकाणी आगीचा भडका उडाला होता. यामध्ये मृत्यूस कारण ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून धनंजय याला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा तपास पोलीस (Police) करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दोन्ही बंधू एकत्र आले तर काही परिणाम होणार नाही: Chandrashekhar Bawankule यांचं विधान

Bharti Singh Video : भारती सिंगनं डिलिव्हरीच्या २ दिवसांनी मुलाला घेतलं हातात; पाहताच रडायला लागली, नावही ठेवलंय खास

Palghar: शिवीगाळ, धमक्या अन् मानसिक छळ, सावकारांच्या जाचाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या, ३ पानी सुसाईड नोट सापडली

Heart blockages warning signs: हार्ट ब्लॉकेज आहेत, आधीच मिळतात हे ५ संकेत; अजिबात दुर्लक्ष करू नका

Pune Metro: पुणेकरांसाठी कामाची बातमी! हिंजवडीतून या दिवशी धावणार मेट्रो, अधिकृत तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT