Virginity Test Saam Tv
मुंबई/पुणे

Virginity Test: सुनेवर कौमार्यभंगाचा ठपका ठेवून छळ, उच्चशिक्षित पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा दाखल

28 वर्षीय विवाहितेने याप्रकरणी तक्रार दिली असून तिच्या अमेरिकास्थित पतीसह सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे.

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे : पुण्यातील एका उच्चशिक्षित कुटुंबीयांनी सुनेवर कौमार्यभंगाचा (Virginity Testing) ठपका ठेऊन तिचा छळ केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय. घटस्फोट देण्यासाठी तिचे लग्नाआधी अनैतिक संबंध असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केलाय (FIR against in-laws and husband for virginity test in Pune).

28 वर्षीय विवाहितेने याप्रकरणी तक्रार दिली असून तिच्या अमेरिकास्थित पतीसह सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे. हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला उच्चशिक्षित (Highly Educated) आहे. काही दिवसांपूर्वी तिचे लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर ते अमेरिकेत गेले होते.

दरम्यान, मधुचंद्राच्या पहिल्या रात्री तक्रारदार महिलेला ब्लिडिंग का झाले नाही, अशी विचारणा केली गेली. लग्नाच्या आधी कोणासोबत शारीरिक संबंध होते का? अशी विचारणा करून वारंवार भांडण काढली. तक्रारदार महिलेला मारहाण करून घटस्फोट (Divorce) देण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात आला.

या सगळ्या सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून, भांडणामुळे काही दिवसांपूर्वी ते पुन्हा भारतात आले. सध्या ते पुण्यात (Pune) राहतात आणि इथे देखील तिचा छळ सुरु होता.

दरम्यान, या सर्व प्रकारानंतर तक्रारदार महिलेने हडपसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी 498 अ, 323, 504, 506, 34 इत्यादी कलमानुसार पती, सासू आणि सासरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हडपसर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : पंतप्रधान मोदी देणार 5 हजारांचं गिफ्ट? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

Diwali 2025 Shani Vakri: दिवाळीला बऱ्याच वर्षांनी होणार शनी वक्री; 'या' राशींना मिळणार शनीचा आशिर्वाद

Shaniwarwada Namaz Row: नमाजपठणवरुन महायुतीत जुंपली; मेधाताईंना अटक करण्याची ठोंबरेंची मागणी

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांचा अजब पॅटर्न; घरी बोलावून शेतकऱ्याचं सोडवलं उपोषण

SCROLL FOR NEXT