'एमपीएससी'च्या रिक्त जागा तातडीने भरा; माधव भंडारींची मागणी
'एमपीएससी'च्या रिक्त जागा तातडीने भरा; माधव भंडारींची मागणी Saam Tv
मुंबई/पुणे

'एमपीएससी'च्या रिक्त जागा तातडीने भरा; माधव भंडारींची मागणी

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व रिक्त जागा भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळ अधिवेशनात केली होती. मात्र अजूनही याबाबत राज्य शासनाकडून कार्यवाही झालेली नाही. याच पार्श्वभूमीवरती "आता तरी महाविकास आघाडी सरकारने MVA Goverment वेळकाढूपणा बंद करावा आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या रिक्त जागा तातडीने भराव्यात," अशी मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी पत्रकाद्वारे केली आहे. Fill the vacancies of MPSC immediately; Demand of Madhav Bhandari

पुण्यातील स्वप्नील लोणकरSwapnil Lonkar या विद्यार्थ्यांने 'एमपीएससी'MPSC ची परिक्षाEXAM उत्तीर्ण होवूनही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पास झालेल्या मुलांना कुठेही सेवेत रुजु करुन घेतले नाही त्यासाठी वेळखाऊ पणा केला आणि याच ढीसाळ व्यवस्थेला कंटाळून स्वप्नीलने आपले आयुष्य संपवले. या घटनेमुळे राज्याभरातून 'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांनसोबतच राज्यातील सर्व घटकांतील नागरिकांच्या रोषाला महाविकास आघाडीला सामोर जावं लागलं होतं.

अधिवेशनामध्ये विरोधकांनी हा मुद्दा लावून धरल्यावरती उपमुख्यमंत्री अजित पवारांनीDcm Ajit Pawar राज्य लोकसेवा आयोगातील सर्व रिक्तपदे 31 जुलै 2021 पर्यंत भरू असे आश्वासन दिले होते आणि आज 31 तारिख असूनही या भरतीबाबत काहीच निर्णय झाला नाही उलट अजून 15 दिवसांची मुदतवाढ केल्याने सरकार केवळ वेळकाढू पणा करतय का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. "आता तरी महाविकास आघाडी सरकारने वेळकाढूपणा बंद करावा आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या रिक्त जागा तातडीने भराव्यात," अशी मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारीBJP Leader Madhav Bhandari यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

पत्रकात श्री. भंडारी यांनी म्हटले आहे की, 'एमपीएससी'च्या कारभाराला कंटाळून स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर विधिमंडळ अधिवेशनात भाजपाच्या आमदारांनी याबाबत अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केले होते. भाजपा आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 31 जुलैपर्यंत राज्य लोकसेवा आयोगाच्या सर्व रिक्त जागा भरणार अशी घोषणा केली होती. मात्र 31 जुलैपर्यंत लोकसेवा आयोगाच्या रिक्त जागा भरण्यात आलेल्या नाहीत.

महाविकास आघाडी सरकारने वेळकाढूपणा बंद करावा आणि या जागा भरण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच सरकारने विद्यार्थ्यांचे खच्चीकरण करू नये, असेही माधव भंडारी यांनी पत्रकात नमूद केले आहे.

Edited By- Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mental Health: मानसिक आरोग्य बिघडलंय? अशी घ्या काळजी

Dharashiv Lok Sabha Votting Live: लातूरच्या औसा येथे EVM मध्ये तांत्रिक बिघाड, ४५ मिनिटांपासून मतदान थांबले

Solapur Breaking: मतदानाला सुरुवात होताच सोलापूरमध्ये EVM मशीनमध्ये बिघाड; मतदारांचा खोळंबा, अधिकाऱ्यांची धावपळ

Maharashtra Weather Forecast: राज्यात पुढील २ दिवस तापमानात वाढ होणार, मराठवाडा आणि विदर्भात गारपीटीची शक्यता

Baramati Lok Sabha: बारामतीत पैशांचा पाऊस, पोलीस बंदोबस्तात मतदारांना पैसे वाटले; VIDEO शेअर करत रोहित पवारांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT