Dombivali Crime: विवाहितेचा पाठलाग करणाऱ्या माथेफिरुला नागरिकांचा चोप...(पहा Video) प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

Dombivali Crime: विवाहितेचा पाठलाग करणाऱ्या माथेफिरुला नागरिकांचा चोप...(पहा Video)

महिला असुरक्षित असल्याची एक घटना समोर आली

प्रदीप भणगे

मुंबई: डोंबिवलीत महिला असुरक्षित असल्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. येत्या मंगळवारी जगभर महिला दिन साजरा करण्याची तयारी असतानाच रस्त्याने जाणाऱ्या एकट्या दुकट्या महिला असुरक्षित असल्याची एक घटना समोर आली आहे. पत्ता विचारण्याचा बहाणा करून एका महिलेचा पाठलाग करत तिच्या घरापर्यंत पोहोचणाऱ्या एका बदमाश्याला रहिवाशांनी चोपून ताब्यात दिल्यानंतर डोंबिवली पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला आहे. (Filed case against man chasing married woman)

पहा व्हिडिओ-

या घटनेतील पीडित महिला डोंबिवली (Dombivali) पूर्वेकडील मानपाडा (Manpada) रोडला असलेल्या चार रस्ता चौक परिसरातील एका इमारतीत राहते. रविवारी २० फेब्रुवारी रोजी रात्री १०:१५ वाजेच्या सुमारास ही महिला रस्त्याने जात होती. इतक्यात अनोळखी इसमाने तिला गावदेवी मंदिर कुठे आहे? असा प्रश्न विचारला. या महिलेने सामाजिक भावनेतून सदर इसमाला पत्ता सांगितला. मात्र, त्यानंतर सदर इसमाने या महिलेचा पाठलाग सुरू केला.

हे देखील पहा-

ही महिला ज्या इमारतीत राहते. त्या इमारतीपर्यंत हा इसम पोहोचला. विशेष म्हणजे हा माथेफिरू सदर महिला ज्या मजल्यावर राहते तेथेही पोहोचला. हे पाहून त्या महिलेने पाठलाग का करतोस, असा जाब विचारल्यावर त्याने तिला शिवीगाळ करत मारण्याची धमकी (Threat) दिली. आरडा- ओरडा ऐकून इमारतीतील रहिवासी घराबाहेर आले.(Filed case against man chasing married woman)

या रहिवाशांनी पडकून चोपल्यानंतर त्या माथेफिरूला पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून ३२ वर्षीय माथेफिरू विरोधात भादंवि ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

Viral Video: भंयकर वास्तव! पाय ठेवायला जागा नाही, तरीही भाऊचा लोकलच्या दारात उभं राहून प्रवास, व्हिडीओ पाहा

Solapur Airport : सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार! २० डिसेंबरपासून मुंबई आणि गोवासाठी विमानसेवा

Viral Video: नजर हटी... मोबाइलच्या नादात भरकटला, दुचाकी थेट कारला धडकली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

Astrology: आजपासून 'या' राशींचे दिवस चमकणार, शनीची साडीसती संपणार

SCROLL FOR NEXT