Eknath Shinde News, Pune Latest Marathi News
Eknath Shinde News, Pune Latest Marathi News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune: एकनाथ शिंदे यांच्याविरोधात पुण्यात तक्रार दाखल

साम टिव्ही ब्युरो

पुणे : शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध शिवाजीनगर न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीकरिता वेळोवेळी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रासोबत दाखल केलेल्या शपथपत्रातील तफावतींबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Pune Latest Marathi News)

अतिरिक्त न्यायालयाच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अभिजित खेडकर व डॉ. अभिषेक हरिदास यांनी ॲड. समीर शेख यांच्यातर्फे ही तक्रार दाखल केली आहे. प्राथमिक सुनावणीनंतर ही तक्रार ठाणे येथील न्यायालयात वर्ग करण्यात येईल. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी २००९, २०१४ आणि २०१९ साली कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांमध्ये त्यांच्या शिक्षणाच्या नोंदीसह मालमत्तेच्या तपशिलात तफावत असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी २०१९ सालच्या प्रतिज्ञापत्रात शेयर्समधील गुंतवणुकीमधील युनिटचा तपशील लपवला आहे. या प्रतिज्ञापत्रात शिंदे यांनी आर्माडा जीप ३० जानेवारी २००६ साली ९६ हजार ७२० रुपयात खरेदी केल्याचे नमूद केले असून २०१४ च्या प्रतिज्ञापत्रात ही जीप आठ लाख रुपयांना खरेदी केल्याचे नमूद केले आहे. २०१९ प्रतिज्ञापत्रात शिंदे यांनी स्कॉर्पियो जीप एक लाख ३३ हजार रुपयांना खरेदी केल्याचे नमूद केले आहे. तर, २०१४ च्या प्रतिज्ञापत्रात तीच जीप ११ लाख रुपयांना खरेदी केल्याचे नमूद केले आहे.

२०१९ च्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी बोलेरो जीप एक लाख ८९ हजार ७५० रुपयात खरेदी केल्याचे नमूद केले आहे. तर २०१४ सालच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी हीच जीप सहा लाख ९६ हजार ३७० रुपयात खरेदी केल्याचे नमूद केले आहे. टेम्पो, इनोव्हा या वाहनांच्या खरेदीच्या किमतीबाबत तसेच शेतजमीन, व्यापारी गाळ्यांच्या माहितीबाबतही विसंगती असल्याचा दावा तक्रारकर्त्यांनी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : छोटे पक्ष निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलीन होतील का? उद्धव ठाकरे शिवसेनेविषयी काय म्हणाले?

Virar News : महिलेने पोलीस अधिकाऱ्याच्या मनगटाचा घेतला चावा; शिवीगाळ, धक्काबुक्की करत विरारमध्ये मद्यधुंद महिलांचा राडा

Amit Shah News: खिचडी घोटाळा, कलम 370, राम मंदिर; जालन्यात अमित शाह यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Sam Pitroda Resigns: वादग्रस्त विधानाने काँग्रेसला टाकलं गोत्यात; सॅम पित्रोदा यांनी दिला राजीनामा; काय होता वाद?

Nagpur Earthquake : नागपूर जिल्हा चौथ्यांदा हादरला, बुधवारी 4 वाजता पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के

SCROLL FOR NEXT