Hill Line Police Station
Hill Line Police Station Saam Tv
मुंबई/पुणे

बैलगाडा शर्यतीत हाणामारी; जिंकलेल्या बैलांच्या मालकाचं डोकं फोडलं

प्रदीप भणगे

कल्याण - कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील आणि मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या उसाटणे गावात १ मे रोजी बैलगाडा शर्यती पार पडल्या. या शर्यतींमध्ये दोन गटात झालेल्या वादातून एका तरुणाला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी हिललाईन पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल होऊन ५ दिवस उलटले, तरीही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळं पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

हे देखील पाहा -

उसाटणे गावात १ मे रोजी बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आलं होतं. या शर्यतींदरम्यान दोन गटात वाद होऊन हाणामारीची घटना घडली. या शर्यतींमध्ये कर्जत इथं राहणारा बैलगाडा मालक कल्पेश म्हसे आणि नितळस गावात राहणारा कुणाल काटे हे दोघेही त्यांचे बैल घेऊन आले होते. यापूर्वी काकडवाल गावात झालेल्या शर्यतींमध्ये कल्पेश याच्या बैलांनी कुणालच्या बैलांना हरवलं होतं. त्यामुळं त्या पराभवाचा राग काढण्यासाठी कुणाल यानं उसाटणे गावातल्या शर्यतींदरम्यान कल्पेश म्हसे याच्यावर हल्ला चढवला.

त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्याच्या डोक्यात रॉडने मारहाण केली. या मारहाणीत कल्पेशचं डोकं फुटलं आणि त्याच्या गळ्यातली २ तोळ्यांची सोन्याची चेन गहाळ झाली. यानंतर जखमी अवस्थेतील कल्पेश याने हिललाईन पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र याला आता ५ दिवस उलटूनही पोलिसांनी आरोपींचा साधा शोधही घेतलेला नाही. त्यामुळं आरोपीला अटक करून कारवाई करण्याची मागणी फिर्यादी कल्पेश म्हसे याने केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha 2024: काँग्रेसचं ठरलं! राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार; अमेठीतून तगडा उमेदवार मैदानात!

Horoscope Today : तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय? वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

SCROLL FOR NEXT