पब्जीच्या नादात घर सोडलं, १२ वर्षांच्या मुलाला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलं

बंदी असतानाही लहान मुलं पब्जी गेम खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Nashik Police
Nashik PoliceSaam Tv

नाशिक - गेल्या काही दिवसांपासून मुलं आणि तरुणांमध्ये पब्जी (PUBG) या ऑनलाईन मोबाईल गेमची प्रचंड क्रेझ आहे. मात्र या गेममुळे मुलांमध्ये हिंसा, आक्रमकता, ऑनलाईनचे वेड आणि व्यसनाधीनता वाढत चालली आहे. काहींनी तर पब्जी वेडापायी आपला जीव देखील गमावला असल्याची धक्कदायक घटना घडली आहे. तर काहीचं मानसिक स्वास्थ्य बिघडल. त्यामुळे याची गंभीर घेत केंद्राने या गेमवर बंदी आणली आहे.

मात्र बंदी असतानाही लहान मुलं पब्जी गेम खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पब्जी खेळायला मिळावं यासाठी १२ वर्षांच्या मुलाने घर सोडल्याची घटना घडलीय. नांदेडमध्ये राहाणारा १२ वर्षांचा हा अल्पवयीन मुलगा पब्जी खेळण्यासाठी मोबाईल घेऊन घरातून निघून गेला. आई-वडिलांनी मुलगा घरातून निघून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी तातडीने तपास सुरु करत मुलाचा मोबाईल ट्रॅक केला.

Nashik Police
समलिंगी मैत्रिणींमध्ये जडलं प्रेम; लग्नासाठी घरातूनही पळाल्या, पण शेवटी आलं वेगळंच वळण

यावेळी हा मुलगा मुंबई-तपोवन एक्स्प्रेसने मुंबईकडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याची माहिती सर्व पोलीस स्टेशनला देण्यात आली. तपोवन एक्स्प्रेस नाशिकमध्ये पोहचल्यावर नाशिक पोलिसांनी त्या मुलाला ताब्यात घेतलं. यानंतर त्या मुलाला कुटुंबांच्या स्वाधिन करण्यात आलं.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com