Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Fight News: शिल्लक राहिलेल्या गुलाबजामवरून नातेवाइक अन् केटरर्समध्ये तुफान राडा; भर मांडवातच हाणामारी

Fight Between Relatives and Caterers: या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shivani Tichkule

सचिन जाधव

Pune Crime News: लग्नात शिल्लक राहिलेले गुलाबजाम घरी घेऊन जाण्यावरून नातेवाइक आणि केटरर्स व्यवस्थापक यांच्यात हाणामारी झाल्याची घटना घडली. ही घटना शेवाळेवाडी येथे मंगळवारी (२५ एप्रिल) सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

या प्रकरणी जखमी मंगल कार्यलय व्यवस्थापक यांनी फिर्याद दिली आहे. हडपसर पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, शेवाळेवाडी येथील राजयोग मंगल कार्यालयात लोखंडे आणि कांबळे परिवारांचा विवाहसोहळा होता. केटरिंगचे काम फिर्यादींकडे होते.

सायंकाळी सहाच्या सुमारास वर पक्षाकडील व्यक्तीने राहिलेले जेवण सोबत घेऊन जायचे असल्याचे सांगितले. त्यासाठी काही हरकत नसल्याचे केटरर्स गुप्ता यांनी सांगितल्यावर ती व्यक्ती नातेवाइकांसह राहिलेले जेवण डब्यात भरत होती. त्यातील एक जण गुलाबजाम डब्यात भरू लागला. मात्र, हे गुलाबजाम तुमचे नाहीत. उद्याच्या लग्नाच्या जेवणासाठी तयार केलेले आहेत ते घेऊन जाऊ नका, असे गुप्ता यांनी सांगितले. (Pune News)

त्यामुळे नातेवाईक आणि केटरर्स यांच्यात शाब्दिक वाद झाला. हा वाद इतका वाढला की तीन जणांनी मिळातून गुप्ताला मारहाण केली. तसेच लोखंडी झारा मारून जखमी केले. यानंतर गुप्ता यांचे मालक तिथे आल्यावर आरोपी पळून गेले. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

Badam Benefits: रोज सकाळी ५ बदाम खल्ल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

आधी १४ महिन्यांच्या बाळाला विष पाजलं अन् मग स्वत: आयुष्याचा दोर कापला, सोलापुरातील धक्कादायक घटना

Bhakri Tips: तांदळाची मऊ, लुसलुशीत भाकरी कशी बनवायची? सोपी आहे पद्धत

New Pune Bengaluru Highway : पुण्यातून सहा पदरी राष्ट्रीय महामार्ग जाणार, २०६ किमी लांब, ४२ हजार कोटींचा खर्च, वाचा नेमका मास्टरप्लान

SCROLL FOR NEXT