Mumbai News Saam Digital
मुंबई/पुणे

Mumbai News: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर FDA ची मोठी कारवाई; तूप, 209 किलो मावा जप्त

Mumbai News: मुंबईत ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तुप आणि मोठ्या प्रमाणावर मावा जप्त करण्यात आले आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News

मुंबईत ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तुप आणि मोठ्या प्रमाणावर मावा जप्त करण्यात आले आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील बोरिवली पूर्वेकडील कार्टर रोड नंबर 7 येथील ब्रिजवासी मावावाला या दुकानावर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.

उत्पादनावर लेबल नसणे आणि अस्वच्छ साठवणूक या कारणातून ही छापेमारी करण्यात आली आहे. हे उत्पादन कुठून आणले त्याच्या नेमक्या किमती काय, वापराची अंतिम मुदत काय किंवा त्याच्या दर्जाबाबत संशय असल्याने ही छापेमारी कारवाई करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये गोकुळ कंपनीचे तूप आणि 209 किलो गोड मावा असा एकूण 52 हजार 270 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या माव्याचे सॅम्पल एफडीएच्या लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले असून अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सणासुदीच्या काळात मुंबईत महाराष्ट्र आणि राज्याबाहेरून मोठ्या प्रमाणावर गोड मावा आणला जातो. बऱ्याचदा तो मावा भेसळयुक्त देखील असतो आणि अशा माव्यापासून बनवलेली मिठाई खाऊन अनेकांना त्रास देखील झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर एफडीएकडून अशा भेसळयुक्त मालावर कारवाई केली जाते. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील बोरिवली पूर्वेकडील कार्टर रोड नंबर 7 येथील ब्रिजवासी मावावाला या दुकानात अस्वच्छ पद्धतीने मावा साठवणूक केल्याबाबतची गुप्त माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. या माहितीनुसार अन्न सुरक्षा अधिकारी जी.एम.गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त ए.एन.रांजणे आणि सहाय्यक आयुक्त आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐन निवडणुकीत राज्यात पैशांचा पाऊस; निवडणूक अधिकाऱ्यांनी २ दिवसांत ९०००००० रुपयांची रोकड पकडली

होय मी बाजीरावच, फडणवीसांची टीका, दादांचं प्रत्युत्तर

Maharashtra Live News Update: जास्तीत जास्त मतदान करावं; एकनाथ शिंदेंचं मतदारांना आवाहन

आई-वडिलांची उपेक्षा करणाऱ्यांनो सावधान! आई-वडिलांकडे पाठ, पगारात कपात

उमेदवारांनो सावध राहा! खबरदारीने निर्णय घ्यावे लागेल; ५ राशींचे लोकांच्या कायदेशीर अडचणी वाढण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT