Cough Syrup News :  Saam tv
मुंबई/पुणे

Cough Syrup : कफ सिरप प्रकरणानंतर महाराष्ट्रात अलर्ट; अन्न व औषध प्रशासनाने घेतला महत्वाचा निर्णय

Cough Syrup News : कफ सिरप मृत्यू प्रकरणानंतर महाराष्ट्रात अलर्ट मोडवर आहे. अन्न व औषध प्रशासनाने महाराष्ट्रात महत्वाचा निर्णय घेतला आहे.

Vishal Gangurde

कफ सिरपमुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये १२ बालकांचा मृत्यू

महाराष्ट्र FDA ने तात्काळ सिरप वापर थांबवण्याचे आदेश

सिरपमध्ये विषारी Diethylene Glycol रसायन

दोन वर्षांखालील मुलांना कफ सिरप न देण्याचे केंद्र सरकारकडून आवाहन

संजय गडदे, साम टीव्ही

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमुळे लहान मुलांच्या मृत्यूचा आकडा वाढला आहे. दोन राज्यात लहान मुलांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातही खबरदारी घेण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने कोल्ड्रिफ सिरपचा तात्काळ वापर थांबविण्याचे आदेश दिले आहेत.

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कोल्ड्रिफ सिरपच्या सेवनामुळे काही बालकांच्या मृत्यू झाल्याच्या घटनांनंतर महाराष्ट्रात ही कारवाई करण्यात आली आहे. सिरप हे Sresan Pharma, कांचीपुरम (तामिळनाडू) यांनी तयार केली आहे. या सिरपमध्ये Diethylene Glycol (DEG) या विषारी रासायनिक पदार्थाने भेसळलेली आढळली आहे.

एफडीएने सर्व विक्रेते, वितरक आणि रुग्णालयांना या सिरपचा साठा तात्काळ गोठवण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांना देखील या सिरपचा वापर न करण्याचे आणि त्याबाबतची माहिती स्थानिक औषध नियंत्रण प्राधिकरणांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित तक्रारीसाठी हेल्पलाइन क्रमांक 1800222365 किंवा ईमेल jchq.fda-mah@nic.in आणि मोबाईल क्रमांक 9892832289 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

एफडीए महाराष्ट्राचे औषध नियंत्रक डी. आर. गहाणे यांनी सांगितले की, 'सार्वजनिक आरोग्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी'.

२ वर्षांखालील मुलांना कफ सिरप बंदी

मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांमधून १२ हून अधिक लहान मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर केंद्र सरकारने एक निवेदन जारी केलंय. दोन वर्षांखालील मुलांना कफ आणि सर्दी सिरप देऊ नये, असे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आलं आहे. आरोग्य सेवा महासंचालनालयाने बालरुग्णांमध्ये कफ सिरपच्या वापराबद्दल महत्वाच्या सूचना जारी केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apple Watch: अ‍ॅपल वॉचमुळे वाचला समुद्रात बुडणाऱ्या तरुणाचा जीव, अनुभव ऐकून तुम्हीही व्हाल चकीत

IND W vs PAK W: अग बया! चेंडू खेळला पण क्रीझमध्ये बॅट ठेवायची विसरली अन्...; पाकिस्तानची कर्णधार पंचांना थेट भिडली

Two Group Clash : दुर्गा मूर्ती विसर्जनावरून दोन गटात राडा; वाहन आणि दुकानांची तोडफोड, पोलिस आयुक्तांसहित अनेक जखमी

Gautami Patil: गौतमी पाटीलला अटक होणार? कार अपघातापूर्वीचा सीसीटीव्ही समोर

Ro-Ro Service: 200 प्रवासी आणि 75 वाहनं असलेली रो रो बोट अडकली; विरारच्या समुद्रातील थरार

SCROLL FOR NEXT