Tukaram Mundhe Action On Mumbai Hotels Update Saam Tv
मुंबई/पुणे

Tukaram Mundhe : आयुक्त तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! मुंबईतील प्रसिद्ध ६ हॉटेल्सचे परवाने निलंबित; १९ जणांना बेड्या

Mumbai Tukaram Mundhe Update News : अन्नसुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार मुंबईतील ६ हॉटेल्स, बेकरी आणि क्लबवर FDAची मोठी कारवाई. अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन, अस्वच्छता आणि मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळल्याने परवाने निलंबित केले असून 19 जणांना अटक.

Alisha Khedekar

  • अन्नसुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यभर विशेष तपासणी मोहीम

  • मुंबईतील ६ हॉटेल्स, बेकरी आणि क्लबचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित

  • राज्यभर 31 ठिकाणी छापेमारी,19 जणांना अटक

Tukaram Mundhe News राज्यातून मोठी बातमी समोर आली आहे. अन्नसुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार हातात घेतल्यापासून राज्यातील अन्नात भेसळपासून ते अगदी गुटखा, दारू विक्री करणाऱ्या दुकानदार आणि हॉटेल चालकांना सळो की पळो करून सोडलं. यानंतर आता मुंढे यांनी मुंबईत धडक कारवाई करत अन्नसुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या मुंबईतील सहा हॉटेल्स, बेकरी आणि क्लब यांच्यावर कठोर कारवाई करत त्यांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित केले आहेत. राज्यभर राबवण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान अस्वच्छता, मुदतबाह्य अन्नपदार्थांची विक्री, चुकीच्या माहितीची लेबल, कीटकांचा वावर आणि आवश्यक कागदपत्रांचा अभाव अशा अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या.

अन्नसुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ही विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत राज्यातील ३१ ठिकाणी छापे टाकण्यात आले. तपासणीदरम्यान ३४ लाख ८७ हजार ६०३ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि इतर अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. तसेच प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री, वाहतूक आणि वितरण करणाऱ्या १९ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एका आस्थापनेला दुकानाला करण्यात आले असून तीन वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.

मुंबईतील विविध भागांमध्ये करण्यात आलेल्या तपासणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. नरीमन पॉइंट येथील ‘फ्लिंट अँड वार्सा’ या हॉटेलमध्ये चुकीच्या माहितीचे लेबल असलेले अन्नपदार्थ आढळून आले. तसेच मुदतबाह्य अन्नपदार्थ तात्काळ नष्ट करण्यात आले. बोरिवली येथील एका बेकरीमध्ये दुरुस्तीचे काम सुरू असतानाच अन्न उत्पादन सुरू असल्याचे निदर्शनास आले. याशिवाय तेथे मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आढळली.

भांडुप, सांताक्रूझ, अंधेरी आणि वांद्रे येथील काही हॉटेलमध्येही स्वच्छतेचा अभाव, झुरळे व उंदरांचा वावर अन्नसुरक्षा नियमांचे अपुरे पालन तसेच ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेतील गंभीर कमतरता आढळून आल्या. या सर्व बाबी ग्राहकांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे FDAने स्पष्ट केले. अन्न व औषध प्रशासनाने संबंधित हॉटेलना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले असून भविष्यातही अशा विशेष मोहिमा सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवी मुंबईतील वाशी भाजी मार्केट पावसामुळे कोसळलं

Newborn baby: जन्मानंतर बाळाचं पहिलं रडणं का महत्त्वाचं असतं?

Monsoon Eye Infection : पावसाच्या पाण्यामुळे डोळ्यांचे आरोग्य धोक्यात! उद्भवतात 'हे' ५ गंभीर आजार

तोंडाचा वास येणे असू शकते गंभीर आजाराचे लक्षण; दुर्लक्ष न करता वेळीच घ्या दातांची काळजी

Maharashtra Politics: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ८ दिवसांत विश्वासू आमदाराला फोडलं

SCROLL FOR NEXT