Crime News Latest News SAAM TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime : धक्कादायक! बापानेच केला मुलीचा विनयभंग; चेंबूर येथील धक्कदायक घटना

या घटनेनंतर पीडित मुलगी ही मानसिक तणावात होती.

सुरज सावंत

Mumbai Crime News : मुंबईच्या (Mumbai) चेंबूर परिसरात वडिलांनीच मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरसीएफ पोलीस (Police) ठाण्यात ४४ वर्षीय व्यक्तीवर विविध कायद्यांतर्गग गुन्हा दाखल केला आहे. आरोपी वडिलांनी अल्पवयीन मुलगी झोपलेली असताना, तिला चुकीचा स्पर्श केला. या घटनेनंतर पीडित मुलगी ही मानसिक तणावात होती.

यातूनच मुलीने रेस्टिलच्या गोळ्या घेऊन झोपली. पीडित मुलगी बेशुद्ध अवस्थेत असल्याने तिल जवळील चंद्रा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलगी शुद्धीवर आल्या डाॅक्टरांनी तिच्याजवळ विचारपूस केली असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

त्यावेळी आरोपी बापाने तेथून पळ काढताना, डाॅक्टरांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र, डाॅकटरांना धक्का मारून आरोपीने पळ काढला. अखेर पोलिसात गुन्हा नोंदल्यानंतर पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

घरात एकटी असल्याचा फायदा घेत विनयभंग

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी घरात एकटी होती आणि आरोपीने त्याचा फायदा घेतला. मुलीने रेस्टिलच्या गोळ्या घातल्याने ती बेशुद्ध झाली त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डाॅक्टरांनी तिच्याजवळ विचारपूस केली असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावतीत युवक काँग्रेसचा ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह

पावसाळ्यात मिळणारी चमचमीत आणि औषधी तरोटा भाजी, एकदा तरी नक्की खा

8th Pay Commission : फिटमेंट फॅक्टर 3 टक्क्यांपेक्षा कमीच राहणार? आठव्या वेतनाबाबत आली मोठी अपडेट

Water Metro: मुंबईत तयार होणार जगातील सर्वात मोठं वॉटर मेट्रो नेटवर्क, कुठून कसा प्रवास अन् काय आहे विशेष?

Burping Remedies : जेवल्यानंतर सतत ढेकर येतात? आजपासूनच करा 'हा' रामबाण उपाय

SCROLL FOR NEXT