nitesh Rane
nitesh Rane saam tv

Nitesh Rane : आमदार नितेश राणेंपासून जीविताला धोका; देवगडच्या नगराध्यक्षांची पोलिसात तक्रार

भाजप आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
Published on

Nitesh Rane News : भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या विरोधात देवगडच्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू (Sakshi Prabhu) यांनी देवगड पोलिसात तक्रार दिली आहे. आमदार नितेश राणे यांनी आपल्याला मोबाईलवर संपर्क करून 25 लाख रूपये आणि भाजप कडून नगराध्यक्ष पदाची ऑफर दिली. इतकेच नाही तर तसे न केल्यास बदनामी करण्याची धमकी दिल्याचे साक्षी प्रभू यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. प्रभू या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगराध्यक्ष आहेत.

nitesh Rane
UP By-Election: अखिलेश यादव यांना मोठा झटका, माजी मंत्री करणार भाजपमध्ये प्रवेश

आमदार राणे व त्यांच्या नगरसेवीका प्रणाली माने आणि मिलिंद माने हे आपल्याला भाजपात येण्यासाठी दबाव टाकत असून भाजपमध्ये प्रवेश न केल्यास आपल्याला बदनाम करू अशी धमकी दिल्याचे त्यांनी आपल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. तसेच माझ्या जीवाचे काहीही बरे वाईट झाल्यास त्याला आमदार नितेश राणे, नगरसेविका प्रणाली माने आणि मिलिंद माने यांना जबाबदार धरण्यात यावेअसेही त्यांनी या म्हटले आहे.

तर नगरसेवीका प्रणीली माने यांनी साक्षी प्रभू यांनी केलेलं सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आमदार नितेश राणे यांनी धमकी दिली असे कुंभाड रचून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न साक्षी प्रभू यांच्याकडून करण्यात येत आहे. साक्षी प्रभू यांच्या विरोधात आपण अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा देखील प्रणीली माने यांनी यावेळी दिला आहे.

केवळ स्टंटबाजी करून प्रसिद्धी मिळवण्यासाठी नगराध्यक्षा प्रभू यांच्याकडून राणेंना नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही प्रणाली माने यांनी केला आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणावर नितेश राणे काय प्रतिक्रिया देतेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com