farmers demands rs 40 for milk rasta roko andolan in chikhali near nagar
farmers demands rs 40 for milk rasta roko andolan in chikhali near nagar  Saam Digital
मुंबई/पुणे

Maharashtra Milk Price Issue: दूधदरासाठी शेतकरी उतरले रस्त्यावर, नगर जिल्ह्यात रास्ता राेकाे आंदाेलनास प्रारंभ (पाहा व्हिडिओ)

Siddharth Latkar

- सचिन बनसोडे / मंगेश कचरे

दूध दरासाठी राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. नगर जिल्ह्यातील कोल्हार घोटी राजमार्गावर आज (शुक्रवार) दूध उत्पादक शेतक-यांनी रास्ता रोको आंदोलन छेडले आहे. या आंदाेलनात शेकडाे शेतकरी सहभागी झाले आहेत. शिव आर्मी संघटनेने देखील आक्रमक पवित्रा घेत सरकारकडे विविध मागण्या केल्या.

दुधाला किमान 40 रुपये भाव मिळावा यासह अनुदानाच्या मागणीसाठी संगमनेर तालुक्यातील चिखली या गावात शेतक-यांनी आंदोलन छेडले आहे. उद्या दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत बैठक बोलावली आहे मात्र आज त्यांच्याच अहमदनगर जिल्ह्यात दूध दरासाठी शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले.

दरम्यान भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी दुधापासून तयार होणारी पावडर निर्यात करण्यास परवानगी मिळावी. निर्यात करण्यासाठी किमान पन्नास रुपये प्रति टन अनुदान सरकारने द्यावे.

गुजरात कर्नाटक या राज्यात अशा पद्धतीचा विचार विनिमय सुरू आहे. अमूलकडे मोठ्या प्रमाणात पावडर शिल्लक आहे भविष्यातील संकटे पाहता हे गरजेचे आहे. 29 तारखेला मंत्री विखे पाटील यांनी या प्रस्तावाबाबत बैठक आयोजित केली आहे. या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी केल्याचे साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Card: आता आधार कार्ड बनवायला लागू शकतात 6 महिने, UIDAIने केले 3 मोठे बदल

Shukra Rashi Parivartan : ४ दिवसांत ३ राशींचे नशीब उजळणार; यशाचा मार्ग गवसणार, वाचा

Pune Tourist Places: पुण्यात पर्यटनस्थळी प्रतिबंधात्मक आदेश लागू! कुठल्या ठिकाणी जमावबंदी आणि काय आहेत नियम? जाणून घ्या

Team India's Victory Parade In Mumbai Live: वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाचा सन्मान, BCCI ने दिला 125 कोटी रुपयांचा धनादेश

Rahul Gandhi: विरोधी पक्षनेते होताच राहुल गांधी अ‍ॅक्शन मोडमध्ये; पंतप्रधानांच्या बालेकिल्ल्यात भाजपला हरवण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन

SCROLL FOR NEXT