Kalyan Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan Crime: हॉटेलमध्ये ३ महिन्यांपासून सुरू होता वेश्या व्यवसाय, २ महिलांना नको त्या अवस्थेत पकडलं; प्रसिद्ध महिला वकिलाला अटक

Woman Lawyer Arrested in Kalyan: कल्याणमध्ये महिला वकिलाला सेक्स रॅकेट प्रकरणी अटक करण्यात आली. कल्याणमधील हॉटेलमध्ये ती वेश्या व्यवसाय चालवत होती.

Priya More
  • कल्याणमध्ये कथित सेक्स रॅकेटवर पोलिसांचा छापा

  • प्रसिद्ध महिला वकिलेला अटक करण्यात आली

  • दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली

  • या प्रकरणात आणखी आरोपी असण्याची शक्यता

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याणमध्ये प्रसिद्ध महिला वकिलाला सेक्स रॅकेटप्रकरणी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दोन पीडित महिलांची सुटका केली. या घटनेमुळे कल्याणमध्ये खळबळ उडाली आहे. ठाणे मानव तस्करी प्रतिबंधक कक्षाने ही कारवाई केली. गेल्या तीन महिन्यापासून ती सेक्स रॅकेट चालवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आणखी किती मुलींना वकील मनीषाने सेक्स रॅकेटमध्ये अडकवले आहे याचा तपास कोळसेवाडी पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण शहरातील एका नामांकित महिला वकिलाला कथित सेक्स रॅकेट चालवल्याप्रकरणी ठाणे मानव तस्करी प्रतिबंधक कक्षाने अटक केली. या कारवाईत २ पीडित तरुणींची सुटका करण्यात आली. या प्रकरणामुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्या महिला वकिलाचे नाव मनीषा नांदे असल्याची माहिती समोर आली आहे. त्या कल्याण आणि पनवेल येथील न्यायालयांमध्ये वकिली व्यवसाय करत होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ३ महिन्यांपासून कल्याण पूर्वेतील एका नामांकित हॉटेलमध्ये हा कथित देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मानव तस्करी प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून छापा टाकण्यात आला. या कारवाईत दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली. तर या प्रकरणात पोलिसांनी वकील मनीषा नांदे यांना बेड्या ठोकल्या.

मनीषा कांदेने आणखी किती तरुणींना या रॅकेटमध्ये ओढले?, त्याच बरोबर हॉटेल चालकाचा यामधील सहभाग काय? याचा तपास कोळसेवाडी पोलिस करत आहेत. या रॅकेटमध्ये इतर कोणाचा सहभाग आहे का? याचाही तपास पोलिसांकडून सुरू असून ते अधिक माहिती गोळा करत आहेत. या प्रकरणाबाबत पोलिस निरीक्षक एस. जी. नाईक यांनी कारवाईची माहिती दिली असून तपास पूर्ण झाल्यानंतर आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य

Rain Alert : राज्यात ऊन-सावल्यांचा खेळ; मराठवाड्यासह 'या' जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Nepal Floods: नेपाळमध्ये महाप्रलय! महापुरानंतर भूकंपाचे धक्के, मृतांचा आकडा ४०० वर; २९० भारतीय बेपत्ता

Rakshabandhan Horoscope: रक्षाबंधनाचा दिवस कोणत्या राशीसाठी ठरणार खास? भावंडांकडून मिळेल प्रेम, आनंद आणि मोठी खुशखबर!

चीनमुळे नेपाळमध्ये महाप्रलय? 300 जणांचा मृत्यू, शेकडो भारतीय बेपत्ता

SCROLL FOR NEXT