Mumbai Pune Expressway Accident  Saam TV News Marathi
मुंबई/पुणे

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, रील स्टार तरूणीचा जागीच मृत्यू

Asfiya Bano accident : दुर्दैवी अपघातानंतर सोशल मीडिया विश्वात शोककळा पसरली आहे. असफियाच्या चाहत्यांनी तिच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.

Namdeo Kumbhar

  • २२ वर्षीय असफिया बानोचा पनवेलजवळ अपघातात मृत्यू

  • चालकासह चार जण गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू

  • अतिवेगामुळे अपघात झाल्याची पोलिसांची माहिती

  • सोशल मीडियावर शोककळा, चाहत्यांकडून श्रद्धांजली

Mumbai Pune Expressway crash : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पनवेलजवळ क्रूझरचा भीषण अपघात झाला, यामध्ये २२ वर्षाच्या इन्फ्लूएन्सर असफिया बानो मोहम्मद फरीद खान हिचा जागीच (Famous influencer Asfiya Bano dies in Panvel SUV accident) मृत्यू झाला आहे. असफिया खानही उत्तर प्रदेशमधील लखनौ येथील आहे. असफिया मित्रांसोबत फिरण्यासाठी मुंबईला आली होती. ती लोणावळ्याला निघाली होती, त्यावेळी पलस्पे फाट्याजवळ गाडी काँक्रीट ब्लॉकला धडकून पलटी झाली. त्यामध्ये असफियाचा मृत्यू झाला तर चार जण जखमी आहेत. जखमींना मुंबईतील कपूर रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजतेय.

२२ वर्षाच्या असफियाचे सोशल मीडियावर दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. १५ दिवसांपूर्वी ती आपल्या मित्रांसह टोयोटा क्रूझर गाडीतून मुंबईत आली होती. रविवारी मध्यरात्री ती आणि तिचे मित्र मुंबईहून लोणावळ्याकडे जात होते, त्यावेळी काळाने घाला घातला. चालक नूर आलम खान (वय ३४) याचे एसयूव्हीवरील नियंत्रण सुटले. गाडी रस्त्यावरील काँक्रीट ब्लॉकला धडकून पलटी झाली. या अपघातात मागच्या सीटवर बसलेल्या असफियाला डोक्याला गंभीर दुखापत झाली अन जागेवरच मृत्यू झाला. तर मोहम्मद अरबाज मोहम्मद अहमद (वय २४), मोहम्मद अरिफ मोहम्मद आझम (वय २४) आणि रिझवान खान (वय २६) हे देखील गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, असफियावर उपचार करण्याआधीच डॉक्टरांनी मृत घोषित केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष दिगे यांनी सांगितले की, हा अपघात अतिवेगाने गाडी चालवल्यामुळे घडला आहे. चालकाच्या विरोधात गुन्ह दाखल करण्यात आला आहे. अपघातामध्ये गाडीचा चक्काचूर झाला आहे. एअरबॅग्जमुळे इतर चार जणांचा जीव वाचला, परंतु असफियाला झालेली गंभीर दुखापत प्राणघातक ठरली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: सासरच्या जाचाला कंटाळून आयुष्य संपवलं, गर्भवती महिलेने चिमुकलीसह विहिरीत मारली उडी

Crime: संसारात ढवळाढवळ, जावयाची सटकली; सासूला कायमचं संपवलं, शरीराचे १९ तुकडे करून...

Haryana: दोन गटात हाणामारी; दगडफेकीनंतर वाहनं पेटवली, अनेकजण जखमी

Vastu Tips For Money: झोपताना उशीखाली ठेवा 'या' गोष्टी, पैशांची होईल भरभराट

Ajit Pawar: राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवर अजित पवारांनी दिलं बारामतीचं उदाहरण, म्हणाले...

SCROLL FOR NEXT