Pune Crime News Saam tv news
मुंबई/पुणे

Pune Crime: अ‍ॅपवरून भक्तांच्या खासगी आयुष्यात नजर, जादूटोणा अन् वेश्यागमन; पुण्यातील भोंदूबाबाचा पर्दाफाश

Spiritual Fraud Baba: पिंपरी-चिंचवडमध्ये भोंदूबाबा अटकेत! हिडन अ‍ॅपद्वारे व्यक्तीच्या आयुष्यावर नजर ठेवून अश्लील कृत्ये करवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार. पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली आहे.

Bhagyashree Kamble

गोपाळ मोटघरे, साम टीव्ही

पिंपरी चिंचवडमध्ये दिव्यशक्ती असल्याचा दावा करत निष्पाप लोकांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी लोकांच्या खासगी आयुष्यावर ‘हिडन अ‍ॅप’द्वारे नजर ठेवून त्यांच्याकडून अश्लील आणि अनैतिक कृत्ये करवून घेत होता. इतकंच नाही, तर वेश्यागमनासाठीही जबरदस्ती करत असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी फिर्यादीने आरोप करत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी भोंदूबाबाला बेड्या ठोकल्या आहेत.

प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार (वय वर्ष २९) असे आरोपी भोंदूबाबाचे नाव आहे. स्वत:कडे दिव्यशक्ती असल्याचं सांगत त्याने आतापर्यंत अनेकांना फसवलं आहे. त्याच्या जाळ्यात एक ३९ वर्षीय व्यक्ती फसला. दिव्यशक्ती असल्याचं सांगत भोंदूबाबा त्याच्याकडून अनेक गोष्टी करवून घेत होता. बाबाने त्या व्यक्तीला त्याच्या व्यक्तीला एक हिडन अॅप डाऊलोड करायला सांगितले होते. त्याने याद्वारे मोबाईलचा अॅक्सेस मिळवला.

भोंदूबाबा या अॅपद्वारे फिर्यादी आणि त्याच्या जवळच्या लोकांवर लक्ष ठेवून होता. इतकंच नाही तर, त्याने फिर्यादीला अश्लील कृत्य करण्यासही भाग पाडले. बाबाने त्या व्यक्तीला वेश्यागमन करण्यासही भाग पाडले होते. त्याने हे सर्व कृत्य पाहिल्याचे तक्रारीत नमूद केलं आहे.

पैसे उकळले अन् परत दिलेच नाही

मठासाठी पैसे हवेत असे सांगत भोंदूबाबाने तक्रारदाराकडून १५ हजार रुपये उकळले. पैसे घेतल्यानंतर भोंदूबाबाने परत देण्यास टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या व्यक्तीने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच आरोपी भोंदूबाबा विरोधात तक्रार दाखल केली. त्याने तक्रारीत आपल्याप्रमाणे इतरांचीही फसवणूक झाल्याचं नमूद केलं आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी भोंदूबाबा विरोधात तक्रार दाखल केली असून, त्याला अटक करण्यात आली आहे. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डिसीपीच्या गाडीलाच ठोकलं

Money Laundering Probe : ३,००० कोटींच्या प्रकरणात ईडीची धाड, मुंबईसह देशभरात १७ ठिकाणी छापे, ११० कोटी रुपये जप्त

Heavy Rain Mumbai: वसई-विरारसह मीराभाईंदर शहरात पावसाचा धुमाकूळ; रस्ते जलमय, नागरिकांची तारांबळ|VIDEO

Param Sundari: सिद्धार्थ-जान्हवीचा 'परम-सुंदरी' वादाच्या भोवऱ्यात, एका सीनमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी, वाचा नेमकं प्रकरण

GST: सर्वसामान्यांना दिलासा! १२ आणि २८ टक्के जीएसट रद्द होणार; या वस्तूंच्या किंमती होणार कमी

SCROLL FOR NEXT