kandivali news : Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime : दवाखान्यात शिरला, गोड बोलून सोन्याचा कडा घेतला; भोंदूबाबानं भरदिवसा डॉक्टरला लुटलं, VIDEO

kandivali news : भोंदूबाबानं भरदिवसा डॉक्टरला लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. भोंदूबाबाने लुटल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Vishal Gangurde

कांदिवलीत भोंदूबाबांचा सुळसुळाट

दवाखान्यात शिरून डॉक्टरला लुटला

व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईच्या कांदिवली परिसरात भोंदूबाबांचा सुळसुळाट पुन्हा एकदा उघड झाला आहे. एका भोंदूबाबाने चक्क दवाखान्यात शिरून डॉक्टरला लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भोंदूबाबाने डॉक्टरला संमोहित करून सोन्याचा कडा लुटला. भोंदूबाबाने केलेल्या हातचलाखीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली परिसरात असलेल्या डॉक्टर ऋषिकेश म्हात्रे यांच्या दंतचिकित्सक दवाखान्यात सोमवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास दोन भोंदूबाबा शिरले. या दोन्ही भोंदूबाबांनी दवाखान्याची रेकी करून डॉक्टर म्हात्रे यांना लुटण्याचा डाव आखला. भोंदूबाबांनी दवाखान्यातील डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा गोड बोलून विश्वास जिंकला. त्यानंतर भोंदूबाबाने डॉक्टर ऋषिकेश म्हात्रे यांना संमोहित करत हातातील सोन्याचा कडा लुबाडला. भोंदू बाबाच्या लुटीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

व्हिडिओमध्ये काय आहे?

सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये दिसत आहे की, भोंदूबाबांनी हातचलाखीने डॉक्टरला गुंगीत टाकून विश्वासार्हतेचं नाटक केलं. त्यांचा मौल्यवान दागिना घेऊन पसार झाले. विशेष म्हणजे डॉक्टरांना त्यांच्या कड्याची चोरी झाल्याची जाणीव देखील चार तासांनी झाली.

सध्या चारकोप पोलीस या भोंदूबाबांचा शोध घेत आहे. या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा अशा संमोहन करणाऱ्या टोळ्यांविषयी भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नागरिकांनी अशा फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे. भोंदूबाबाने केलेल्या फसवणूक प्रकरणी डॉक्टर म्हात्रे यांनी चारकोप पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर सध्या चारकोप पोलिस या भोंदूबाबाचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्यातील 6 पंचायत समित्यांच्या सभापदी पदाचे आरक्षण जाहीर

Accident News : फुटबॉलपटूचा भीषण अपघात; दुखापतीमुळे शस्त्रक्रिया, १० महिने चालता येणार नाही

Pawan Singh: पिल्स खायला दिल्या, अबॉर्शन करायला भाग पाडलं अन्...; प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचे धक्कादायक आरोप

अपघातात मृत्यू, अंत्यसंस्कारावेळी केक कापला; स्मशानभूमीतच वडिलांकडून लेकीचं वाढदिवस साजरा

Political News : भाजपचं टेन्शन वाढलं, बिहारमध्ये जागावाटपावरून केंद्रीय मंत्री नाराज, थेट ऑफर धुडकावली

SCROLL FOR NEXT