Dhananjay Munde : मंत्रिपद गेलं, पण मुंडेंना सरकारी बंगल्याचा मोह सुटेना; बंगल्यापायी ठोठावला इतक्या लाखांचा दंड, VIDEO

Dhananjay Munde latest news : मंत्रिपद गेल्याच्या 5 महिन्यानंतरही धनंजय मुंडेंना सरकारी बंगला सुटत नाही...त्यावरुन मुंडे नव्या वादात सापडलेत... मात्र मुंडेंनी बंगला का सोडला नाही? आणि त्यांना किती लाखांचा दंड ठोठावलाय? पाहूयात.....
Dhananjay munde News
Dhananjay MundeSaam tv
Published On

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराड कनेक्शन समोर आल्यानंतर धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं.. मंत्रिपद जाऊन तब्बल 5 महिने उलटून गेले तरी मुंडेंनी आपला सातपुडा हा सरकारी बंगला मात्र सोडलेला नाही, त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळांना मात्र अजूनही बंगल्यासाठी वेटिंगवरच राहावं लागतंय...

Dhananjay munde News
Pune News : पुण्यात निर्माणाधीन बांधकामाच्या ढिगाऱ्याखाली ३ कामगार अडकले; एकाचा मृत्यू

खरंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर 15 दिवसात शासकीय बंगला सोडणं नियमाने बंधनकारक असते.. मात्र बंगल्याचा ताबा न सोडल्यानं धनंजय मुंडेंना सार्वजनिक बांधकाम विभागाने 42 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय.... मात्र हा दंड माफ केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्यानं .दमानियांनी मुंडेंना घेरलंय...

Dhananjay munde News
Types Of Gold Carat : बाजारात आलंय नवं सोनं; दागिन्याची किंमत ५० टक्क्यांनी स्वस्त, जाणून घ्या माहिती

आपल्याच सहकाऱ्यानं बंगला खाली न केल्यानं भुजबळ थेट बोलू शकत नसले तरी सातपुड्यात राहायला जाण्याची त्यांची इच्छा काही लपून राहिलेली नाही.

Dhananjay munde News
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी; नव्या निर्णयाने भारताच्या अर्थव्यवस्थेला तडा जाणार?

दुसरीकडे मुंडेंनी मात्र बंगला न सोडण्यामागे आपल्या तब्बेतीचं कारण पुढं केलंय... खरंतर राज्यात तब्बल 42 मंत्र्यांचं भलं मोठं मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आलं... मात्र मंत्रिमंडळातील काही मोठे मंत्री आपला कारभार 2 शासकीय बंगल्यातून चालवत असल्याने तब्बल 16 मंत्र्यांना बंगल्याऐवजी अपार्टमेंटमधील फ्लॅटवरच समाधान मानावं लागतंय... त्यामुळे मुंडे शासकीय बंगला खाली कधी करणार आणि फ्लॅटमधील मंत्र्यांना शासकीय बंगले कधी मिळणार? हे पाहणं औत्स्युकाचं असेल..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com