मुंबई: एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला (Shivsena) उतरती कळा लागली आहे. शिवसेनेच्या अनेक मोठ्या नेत्यांनी शिवसेनेशी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेनेही अनेक दिग्गजांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) आणि आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांनी उद्धव ठाकरेंच्या कारभारावर जाहीर टीका करुन शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर पक्षाकडून या दोन्ही नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात आनंदराव अडसूळ आणि रामदास कदम हकालपट्टी केल्याचं सांगण्यात आलं आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार ही कारवाई केली गेल्याचं म्हटलं आहे. (Uddahv Thackeray Latest News)
हे देखील पाहा -
रामदास कदम यांनी आपल्या नेतेपदाचा राजीनामा देताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अत्यंत खरमरीत पत्र लिहीत आपल्या मनातील खदखद त्यांनी व्यक्त केली आहे. "जसं महाविकास आघाडी सरकार स्थापन झालंय, तसं मी तोंड दाबून लाथा-बुक्क्यांचा मार सहन करतोय. बाळासाहेबांनी माझी नेतेपदी निवड केली पण तुम्ही मात्र माझा आणि माझ्या मुलाचा कित्येकदा अपमान केला. शिवसेनेचा वाईट काळ असताना माझा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. पण तुम्ही मात्र गेल्या ३ वर्षापासून मीडियासमोर बोलायचे नाही, असे आदेश दिले. हे सगळं का आणि कशासाठी? असे एक ना अनेक सवाल करत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' केला आहे.
आनंदराव अडसूळ यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे. अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे. दरम्यान शिवसेनेचे खंदे समर्थक आता एकनाथ शिंदे गटात सामील होण्यास सुरुवात झाली आहे. आमची शिवसेना (shivsena) खरी, असा कांगावा राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरु आहे. आता कोणाची शिवसेना खरी आहे ? हे कोर्टाच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. याच पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे गटाने (National Working Committee) नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे.
एकनाथ शिंदे गटाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून महत्वाच्या पदांवर ज्येष्ठ नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. तर शिवसेनेच्या मुख्य प्रवक्तेपदी दीपक केसरकर यांची नियुक्ती केली आहे.
शिवसेनेच्या नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची वर्णी लागली आहे. तसेच उपनेतेपदाची जबाबदारी यशवंत जाधव,गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे,तानाजी सावंत,विजय नहाटा,शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. शिवसेना पक्ष प्रमुखपदाबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.