Mumbai Local Train :  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Train : लोकल ट्रेनच्या गर्दीवर उतारा काय? प्रवासी संघटनांना काय वाटतं?

Mumbai Local Train Update : लोकल ट्रेनच्या गर्दीचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दिवसेंदिवस वाढत्या गर्दीवर प्रवासी संघटनांनी उपाय सुचवले आहेत. गर्दी कमी करण्यासाठी प्रवासी संघटनांनी अनेक उपाय सुचवले आहेत.

Vishal Gangurde

मुंबई : लोकल ट्रेन आणि गर्दी असं एक समीकरण झालं आहे. मुंबई, ठाण्याजवळील नोकरदारांना गर्दीतून दररोजचा प्रवास करावा लागतो. लोकल ट्रेनने प्रवास करताना पीक अवरमध्ये प्रवाशांना अक्षरश: उभे राहण्यासाठी जागा नसते. या लोकल गर्दीवरून रेल्वे प्रशासनाला मुंबई हायकोर्टानेही झापलं आहे. त्यानंतरही लोकल ट्रेनचा प्रवासामध्ये फारसा बदल झाला नसल्याचे प्रवाशांचा आहे. याच पार्श्वभूमीवर लोकल ट्रेनच्या प्रवाशांनी गुरुवारी पांढरे कपडे आणि काळ्या फिती बांधून रेल्वेचा प्रवास केला. हाच प्रवास सुकर होण्यासाठी प्रवाशांनी काही उपाय सुचवले आहेत.

मुंबईतील मध्य, पश्चिम, हार्बर, ट्रान्स हार्बरवरील सेवेचा प्रवाशांचा त्रास दिवसेंदिवस वाढू लागला आहे. या प्रवासाच्या त्रासाविरोधात प्रवासी संघटनेने गुरुवारी पांढरे कपडे घालून आंदोलन करण्याची हाक दिली होती. तसेच प्रवाशांनी काळ्या फिती देखील बांधल्या होत्या. या आंदोलनादरम्यान प्रवाशांनी मुंबई आणि ठाणे परिसरातील रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रशासनाच्या कारभावरावर टीका केली. यावेळी प्रवाशांनी सुरक्षित प्रवासाची मागणी केली. तसेच प्रवाशांचे आंदोलन शांतामय मार्गाने पार पडले.

लोकलच्या गर्दीवर उतारा काय?

गर्दीवर उतारा म्हणून प्रवाशांनी विविध मागण्या केल्या आहेत. कळवा-ऐरोली लिंकसाठी एमएमआरडीने एमआरव्हीसीला त्वरित जागा हस्तांतरित करण्याची प्रवासी संघटनांची मागणी आहे. तसेच राज्य सरकारने रेल्वे प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. गर्दी कमी व्हावी,याठी प्रशासनाने सकाळी ७.३० ते १०.३० आणि सायंकाळी ५.३० ते ८.३० उशिराने येणाऱ्या मेल एक्सप्रेसऐवजी लोकल प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली आहे.

लोकलसाठी बनवलेल्या ट्रॅकवर केवळ लोकलच चालवाव्यात. वर्षानुवर्षे रखडलेले प्रकल्प पूर्ण करावेत. त्याचबरोबर यांत्रिक बिघाड, ओव्हरहेड वायर तुटणे, मालगाडी, मेल, लोकल रुळावरून घसरल्याने लोकल सेवा रखडली तर आपत्कालीन परिस्थिती जाहीर करावी, अशी मागणी प्रवाशांची आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, हार्बर, ट्रान्सहार्बर, एमआरव्हीसी मिळून वेगळे संयुक्त प्राधिकरण करण्याचही प्रवासी संघटनांची मागणी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेट्रो अधिकाऱ्याच्या कृत्याने मुंबई हादरली; इंजिनीअर असलेल्या महिलेवर ऑफिसमध्येच अत्याचार

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

ठाणे हादरलं! गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला संपवलं, नंतर मृतदेह हिरव्या ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला

CNG, पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या, घरगुती गॅस सिलिंडरचे दरही वाढणार?

Vidyadhar Joshi: 'सोनं खरेदी करणं म्हणजेच विनोद'; मोदींच्या आवाहनावर प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची मार्मिक पोस्ट

SCROLL FOR NEXT