thane saam tv
मुंबई/पुणे

State Excise Department : शंभूराज देसाईंच्या खात्यातील अधिका-यांची जबराट कामगिरी, एक कोटींची गोवा बनावटीची दारु पकडली; एकास अटक

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी पथकाने दाेघांना ताब्यात घेतले आहे.

विकास काटे

Thane Excise Department News : महाराष्ट्रात (maharashtra) विक्रीस परवानगी नसलेला एक कोटींची गोवा बनावटीचा (goa liquor) विदेशी मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे (state excise department thane) भरारी पथकाने जप्त केला आहे. या कारवामुळे मद्य विक्रेत्यांचे देखील धाबे दणाणले आहेत. (Maharashtra News)

ही कारवाई उत्पादन शुल्क अधिक्षक निलेश सांगडे यांच्या निर्देशानुसार निरिक्षक दिगंबर शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक व त्यांच्या सहकार्यानी मुंबई - गोवा महामार्गावरील पनवेल कल्हेगाव (panvel kalegoan) येथील हॉटेल विसावाजवळ केली.

या कारवाईत एकूण एक कोटी १८ लाख ९४ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती अधिक्षक सांगडे यांनी दिली.

विदेशी मद्याचे १५५७ बॉक्स भरलेल्या कंटेनरसह कंटेनर चालक राजशेखर सोमशेखर परगी (वय ४१) आणि त्याचा साथीदार ख्वाजा हुसेन हित्तलमनी (वय ५८) दोघेही राहणार हुबळी (धारवाड) यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी पथकाने ताब्यात घेतले आहे.

दरम्यान राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी राज्यात गाेवा बनावटीची दारु आणणा-यांना जरब बसावी यासाठी ठाेस पावलं उचलण्याचे आदेश अधिका-यांना मध्यंतरी दिले हाेते. त्यानूसार अधिकारी वर्ग देखील सतर्क राहून कार्यरत असल्याचे दिसून येते.

Edited By : Siddharth Latakr

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: टेंभी नाका येथील नवरात्रोत्सवात यंदा बृहदेश्वर मंदिर आणि चारधामचा देखावा

Madhura Joshi: गुलाबी साडी अन् ओठावर लाली, मधुराच्या सौंदर्याची भलतीच चर्चा

Nandurbar Crime : किरकोळ वादातून भररस्त्यात चाकू हल्ला; तरुणाचा मृत्यू, नंदुरबारमध्ये तणावाचे वातावरण

Shahrukh Khan: शाहरुख खानसाठी मुलगा आर्यन झाला फोटोग्राफर; 'बॅड्स ऑफ बॉलीवूड'च्या स्क्रीनिंगचा VIDEO व्हायरल

High Court: मराठा आरक्षणाच्या GR विरोधात याचिका, न्यायाधीशांनी दिला मोठा निर्णय, कोर्टात नेमकं काय काय झालं?

SCROLL FOR NEXT