kishori pednekar  saam tv
मुंबई/पुणे

Kishori Pednekar News: किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत होणार वाढ, ईडी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत

Covid Center Scam News: आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर आता ईडी (ED)देखील त्यांच्याविरोधात मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे.

Priya More

Mumbai News: मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या (Thackeray Group) नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी त्यांच्याविरोधात मुंबईतल्या आग्रीपाडा पोलीस ठाण्यात (Agripada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर आता ईडी (ED)देखील त्यांच्याविरोधात मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. ईडीने किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांची संपूर्ण यादी मागवली आहे. त्यामुळे आता ईडी देखील त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे.

कोरोना काळातील बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ५ ऑगस्ट रोजी किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. बॉडी बॅग खरेदीत ५० लाखांचा घोटाळा केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर आहे. किशोरी पेडणेकर यांच्यासोबत मुंबई महानगर पालिकेच्या दोन अधिकाऱ्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या या गुन्हासंबंधीतीची माहिती ईडीने मागवली आहे. त्यामुळे ईडी देखील किशोरी पेडणेकरांविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी कोरोना काळात मुंबई महापालिकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. कोरोना काळात काढण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत मोठा घोटाळा झाला असून यामध्ये किशोरी पेडणेकर यांचाही सहभाग आहे, असा आरोप त्यांनी केला होता. यानंतर ईडीने या प्रकरणाची चौकशी करत महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांच्या घरी छापेमारी केली होती. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांची देखील चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. अशामध्ये आता त्यांच्याविरोधात गु्न्हा दाखल झाल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत.

कोरोना काळात मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला होता. त्याचसोबत या काळामध्ये औषधांच्या खरेदी वाढीव दरात करुन बॉडी बॅगच्या खरेदीतही घोटाळा करण्यात आला होता. मुंबईत मृत कोविड रुग्णांना वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडीबॅग २००० रुपयांऐवजी ६,८०० रुपयांना खरेदी केल्याचं ईडीने म्हटलं आहे. हे कंत्राट तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचं देखील ईडीने सांगितलं होतं. महत्वाचे म्हणजे कोरोना काळात किशोरी पेडणेकर याच मुंबईच्या महापौर होत्या. याप्रकरणाचा ईडीकडून कसून तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

Maharashtra Politics : अजित पवार मला टॉर्चर करतात, शिंदेंचा गंभीर आरोप

Maharashtra Politics : रोहित पवारांची वृत्ती औरंगाजेबासारखी, मला अजित पवारांच्या मुलांची चिंता; गोपीचंद पडळकर असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT